Mahayuti Rebellion : महायुतीमध्ये बंडखोरी! भाजपला जागा फिक्स होताच मुश्रीफांचा सेनापती निसटला! भैय्या माने स्वबळावर...

Bhaiyya Mane Graduate Constituency Election : महायुतीमध्ये भाजपला पुणे पदवीधर आणि शिक्षकची जागा फिक्स झाली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीत बंडखोरी झाली असून भैय्या माने स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
 Bhaiyya Mane
Bhaiyya Mane sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mahayuti News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ भाजपकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पदवीधर मतदारसंघावरील भाजपने आपला दावा सोडला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक असलेले भैय्या माने काय भूमिका घेणार याकडे लक्ष होते. मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील त्यांची ताकद लावली होती. मात्र, मतदारसंघ भाजपला जाणार असल्याचे स्पष्ट होताच प्रताप माने उर्फ भैय्या यांनी बंडखोरी केली आहे.

माझ्या भविष्याच्या आड येऊ नये, असे सांगत भैय्या माने यांनी पदवीधर निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. तर, महायुती म्हणून मला भाजपसोबत राहवे लागेल, असे सांगत मंत्री मुश्रीफ यांनी आज पासून माझा आणि भैया माने यांचा संबंध संपला, असे जाहीर केले.

मुश्रीफ पुढे बोलताना म्हणाले की, 'मी भैय्या माने यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते ऐकण्याच्या मनःस्थितीमध्ये नाहीत. पदवीधर नोंदणी मध्ये त्यांनी महत्त्वाचे नोंदणी केली आहे.'

भैय्या माने यांनी आपण निवडणूक लढणार ही भूमिका कायम ठेवली असून त्यांचे दौरे सुरू आहेत. त्यांनी यापूर्वी केलेल्या विकास कामांचा पाढा त्यांनी वाचला. सोशल मीडियावर पोस्ट करत ते म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडण्यात आली. या निधीतून विद्यापीठात नॅनो सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजीची मुख्य इमारत मुलांचे वसतिगृह यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर अँड म्युझियम कॉम्प्लेक्स कन्व्हेन्शन सेंटर युवा विकास केंद्र गोल्डन ज्युबिली फॅकल्टी हाऊस लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनअशा विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना मिळणार आहे.

 Bhaiyya Mane
Pune Graduate Constituency Election : महायुतीत पुन्हा ठिणगी! पुणे पदवीधरच्या जागेवर भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीचाही दावा; नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच !

शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधून देखील अनेक जण पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून लढण्याच इच्छुक आहेत. मात्र, या दोन्ही जागा भाजपला जाणार असल्याने इच्छुक उमेदवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 Bhaiyya Mane
Vidhan Parishad Election : पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपणार! येत्या 48 तासांत भाजपचे उमेदवार ठरणार; निवडणुकीबाबत मंत्र्यांचे मोठे विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com