Bharath Gogawale-Sanjay Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Thackeray Vs Shinde : आम्ही चुXXXआहोत की काय, हे दाखवून दिलंय; एकनाथ शिंदेंचा नाद करायचा नाय : शिंदेंच्या शिलेदाराने सुनावले

Bharath Gogawale Statement : भारत-पाकिस्तान सामन्यानंतर खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली. त्यावर मंत्री भरत गोगावले यांनी जोरदार प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदे यांना कमी लेखू नये, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

विश्वभूषण लिमये
  1. संजय राऊतांची टीका – भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर कठोर शब्दांत टीका केली.

  2. भरत गोगावले यांचे प्रत्युत्तर – मंत्री भरत गोगावले यांनी राऊतांच्या वक्तव्याला उत्तर देताना शिंदे गटाची ताकद दाखवून दिल्याचे सांगितले आणि शिंदे यांचा अवमान सहन होणार नाही, असा इशारा दिला.

  3. भारत-पाक सामना सामना पाहणार नसल्याचे गोगावले यांनी म्हटले, पण पंतप्रधान मोदींच्या कारवाईचे कौतुक करीत विरोधकांना सुनावले.

Solapur, 14 September : भारत-पाकिस्तान सामन्यावरून देशात सध्या गदरोळ माजला आहे. मुंबईत आज सकाळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्याला रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी उत्तर दिले. ‘आम्ही चू XXX आहोत की काय आहोत, ते दाखवून दिले आहे. एकनाथ शिंदे यांचा नाद करायचा नाही, हे त्यांनी दाखवून दिले आहे,’ असे गोगावले यांनी म्हटले आहे.

भारत-पाकिस्तान मॅचवरून शिंदे गटाने ठाकरे गटावर टीका केली होती. त्याला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर देताना अत्यंत तिखट भाषा वापरली होती. एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक चुXXXआहेत, असे म्हटले होते. त्यावर भरत गोगावले म्हणाले, ठाकरे गट हे विरोधक आहेत, आंदोलन करणं त्यांचं कामच आहे. ऑपरेशन सिंदूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलिटरीच्या माध्यमातून राबवले, त्यात चुकीचे काय आहे.

पाकिस्तानचा बदला घेण्याचं काम पंतप्रधान आणि मिलिटरी केला असेल, तर त्यात चुकीचे काय? उलट अभिनंदन केले पाहिजे. मग जे विरोध करणार नाहीत, ते विरोधक कसे असू शकतात, असेही भरत गोगावले (Bharat Gogawale ) यांनी स्पष्ट केले.

भारत-पाक सामन्याबाबत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीकेबाबत मंत्री भरत गोगावले म्हणाले, संजय राऊत काय व्यक्तिमत्व आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्यात आम्ही खोलात जाणार नाही. संजय राऊत बोलला नाही तर उद्धव ठाकरे त्याला ठेवतील असे वाटत नाही. त्याला बोलण्यासाठी ठेवले आहे, दुसरं काय करतोय. तो काय पक्ष वाढवतोय किंवा काही करतोय हे सांगा. संजय राऊतला पक्ष बुडवायचं काम दिलं आहे, तो ते चोखपणे करतोय.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर राऊतांनी केलेल्या टीकेलाही गोगावलेंनी उत्तर दिले. ते म्हणाले, आम्ही चु.. आहोत की काय आहोत, ते दाखवून दिले आहे. एकनाथ शिंदे यांचा नाद करायचा नाही, हे त्यांनी दाखवून दिले आहे. वेगवेगळ्या उपमा दिल्याशिवाय संजय राऊतांचा दिवस जात नाही.

‘मी भारत-पाकिस्तान मॅच बघणार नाही’

भारत-पाकिस्तान मॅच मी बघणार नाही. पण, त्यासंदर्भात काही वेगळं वक्तव्य आम्ही करणार नाही. आमच्या पण काही भावना आहेत, असेही रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केले आहे.

प्र.1: संजय राऊत यांनी कोणावर टीका केली?
उ. – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर.

प्र.2: भरत गोगावले यांनी काय प्रत्युत्तर दिले?
उ. – शिंदे गटाची ताकद दाखवून दिल्याचे सांगून राऊतांना उत्तर दिले.

प्र.3: भारत-पाक सामना गोगावले पाहणार आहेत का?
उ. – नाही, ते सामना पाहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्र.4: पंतप्रधानांच्या कोणत्या कारवाईचे गोगावले यांनी समर्थन केले?
उ. – मिलिटरीच्या माध्यमातून केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT