Bharat Gogawale Black Magic Video : अर्धनग्न भरत गोगावले...मंत्रपठण करणारे पुजारी अन् अघोरी पूजा..., राष्ट्रवादीच्या नेत्याने 'तो' व्हिडिओ दाखवला

Bharat Gogawale Suraj Chavan : सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांनी अघोरी पूजा करत असल्याचा दावा केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अर्धनग्न गोगावले एका खुर्चीत बसलेले दिसून येत आहे.
NCP’s Suraj Chavan shares video alleging Bharat Gogawale performed Aghori Puja, triggering political backlash.
NCP’s Suraj Chavan shares video alleging Bharat Gogawale performed Aghori Puja, triggering political backlash. sarkarnama
Published on
Updated on

Bharat Gogawale Vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. रायगडचे पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव आहे. त्यातच पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी दावा केला की भरत गोगोवले यांनी अघोरी पूजा विधानसभा निवडणुकीच्या वेळी केली होती. मोरे यांनी काही फोटो आणि व्हिडिओसुद्धा दाखवले होते.

मोरे यांच्यानंतर सूरज चव्हाण यांनी देखील भरत गोगावले यांचे अघोरी पूजा करत असतानाचा व्हिडिओ आपल्या ट्विटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत असताना 'बाबा भरतशेठ +आघोरी विद्या = पालकमंत्री' असे कॅप्शन देखील त्यांनी दिले आहे.

सूरज चव्हाण यांनी पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले यांनी अघोरी पूजा करत असल्याचा दावा केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अर्धनग्न भरत गोगावले एका खुर्चीत बसलेले दिसून येत आहे. तर त्यांच्या बाजुला दोन भगव्या कपड्यांमध्ये महाराज उभे राहिलेले दिसत आहे. तर,समोर काळ्या कपड्यांमधील एक महाराज मंत्र उच्चारताना दिसत आहे. या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी 'सरकारनामा' करत नाही.

NCP’s Suraj Chavan shares video alleging Bharat Gogawale performed Aghori Puja, triggering political backlash.
Shiv Sena Anniversary : वर्धापनदिनीच ठाकरेंना शिंदेंकडून मोठा झटका; मातोश्रीवर बैठकीला गेलेल्या 2 शिलेदारांनाच फोडले...

अघोरीपूजेसाठी मध्य प्रदेशातून आले पुजारी?

वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेश मधील बागला मुखी उज्जैन येथे असलेल्या देवीच्या मंदिरातून भरत गोगावले यांनी काही पुजाऱ्यांना बोलावले होते. ही अघोरी पूजा करण्यासाठी गोगावले यांनी 11 महाराजांना पाचरण केलं होतं. त्या अकरा महाराजांकडून घरामध्ये मोठी पूजा करून घेण्यात आली.

गोगावलेंवर भ्रष्टाचाराचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी भरत गोगावले हे रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती असताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याच्या आरोप केला होता. तर, आपल्यावर केलेला आरोप परांजपेंनी सिद्ध कारावा अन्यथा तोंडाला काळे फासवे असे प्रतिआव्हान गोगावले यांनी दिले होते.

NCP’s Suraj Chavan shares video alleging Bharat Gogawale performed Aghori Puja, triggering political backlash.
History of Shivsena : शिवसेनेच्या स्थापनेचा पहिला दिवस कसा होता?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com