Kolhapur Bidri Sugar Factory  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bidri Sugar Factory News : गुंतवणूक विधानसभेची, भांडवल बिद्रीचं अन् मरण सभासदांचं

Kolhapur Bidri Sugar Factory : सत्ताधाऱ्यांनी बिद्रीच्या आडून विद्यमान आमदारांना घेरण्यास सुरु केले आहे. त्याला आमदार आबिटकरांकडून प्रत्युत्तर सुरु आहे. पण या दोघांच्यां राजकारणापायी पुढील हंगामात सभासद अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Rashmi Mane

Bidri Sugar factory : राज्यातील सर्वाधिक मोठा कारभार असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. राज्य उत्पादन विभागाने डिस्टलरी परवाना रद्द केला आहे. त्यामुळे पुढील हंगाम सुरू होणार की नाही याची शाश्वती नसताना आजी-माजी आमदारांमध्ये बिद्री वरून रणकंदन सुरू आहे.

आरोप प्रत्यारोप करून आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतःची राजकीय पोळी भाजण्यामागे व्यस्त आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी विधानसभेचे राजकारण करत असताना बिद्रिचं नाव धुळीरूपास मिळवण्याचं काम सुरु आहे. सत्ताधाऱ्यांनी बिद्रीच्या आडून विद्यमान आमदारांना घेरण्यास सुरु केले आहे. त्याला आमदार आबिटकरांकडून प्रत्युत्तर सुरु आहे. पण या दोघांच्यां राजकारणापायी पुढील हंगामात सभासद अडचणीत येण्याची शक्यता आहे.

बिद्री साखर (Sugar Factory) कारखान्याने उपपदार्थ निर्मितीचा सुमारे 130 कोटी रुपयांचा डिस्टिलरी प्रकल्प उभारला आहे. लेखापरीक्षण आणि अनेक कारणावरून तक्रार झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मागील महिन्यात निगडित कारखान्यावर कारवाई केली. या कारवाईत कारखान्याच्या प्रकल्पात त्रुटी आढळल्याने प्रकल्पाला सील ठोकले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी कारखान्याला मोलॅशिस उत्पादन, साठवणूक व विक्री या तिन्ही गोष्टींना बंदी घातली आहे. दरम्यान या सर्वच गोष्टींना बंदी घातल्यानंतर प्रत्यक्षपणे पुढील हंगामासाठी कारखान्याच्या गाळपावर बंदी आल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील हंगामातील सुमारे 10 लाख टन ऊस गाळप होणार की नाही याची शासंकता आहे.

अचानक झालेल्या कारवाईमुळे कारखान्याशी निगडित असणाऱ्या सर्वच घटकांची नाराजी आहे. ज्यांचा उदरनिर्वाह या कारखान्यावर चालतो अशामध्ये संतापाची लाट आहे. मात्र सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार के पी पाटील यांनी या कारवाई मागे आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. कारखाना परिक्षेत्रात असणाऱ्या 218 गावांतील सभासदांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आमदार अबिटकर यांचा निषेध केला.

या संपूर्ण घटनेनंतर विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी देखील माजी आमदार के पी पाटील यांना प्रत्युत्तर दिला आहे. त्यावरून दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या कारवाईमागे आपला कोणताही संबंध नसून चुकीच्या कारभारामुळेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने बिद्रीवर कारवाई केल्याचे सांगितले आहे. इतकेच नव्हे तर भ्रष्टाचाराचा महामेरू बिद्रीचा लुटारू असा हल्लाबोल केला आहे.

वास्तविक पाहता माजी आमदार के पी पाटील (K P Patil) यांच्याकडे आमदार आबिटकर यांच्यावर टीकास्त्र डागायला शस्त्रे शिल्लक नाहीत. आरोप करण्यासाठी मुद्दा नसल्यानेच बिद्री कारखान्याचे भांडवल करून आंबेडकर यांच्यावर आरोप सुरू आहेत. त्यांच्यावर टीका करण्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीची किनार आहे.

या निवडणुकीत आमदार आबिटकर यांच्यावर आरोप करण्यासाठी बिद्री कारखान्याची ढाल केलेली आहे. दोघांनीही आता दंड थोपाटले असून विधानसभेची तयारी सुरू ठेवली.

पण सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या दोघांच्या विधानसभेपेक्षा कारखाना सुरळित चालू होणे महत्त्वाचे आहे. दोघांच्या भांडणात बिद्रीचे नुकसान होऊ नये याची खबरदारी दोन्ही नेत्यांनी घेणे गरजेचे आहे. अशी भावना सभासदांची आहे. अन्यथा जिल्ह्यातील दौलत, आसुर्ले-पोर्ले या कारखान्यांसारखी बिद्रीची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही, असं मत सभासदांच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT