Udayanraje Bhosale  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Win In Satara Loksabha : कॉलरची शान वाढली; साताऱ्यात बाजी पलटली, उदयनराजेंनी मैदान मारलं

Satara Loksabha Election 2024 Result : सातारा लोकसभेच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत सकाळी मतमोजणीस सुरुवात झाल्यापासून शिंदे यांनी विजयाची आघाडी घेतली होती. त्यामुळे उदयनराजे समर्थकांत प्रचंड नाराजी पसरली होती.

Umesh Bambare-Patil

Satara Loksabha News : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत नवव्या फेरीअखेर 19 हजारांवर मताधिक्य घेणाऱ्या शशिकांत शिंदेंची बाजी 14 व्या फेरीत पलटली आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेण्यास सुरवात केली. 17 व्या फेरीअखेर त्यांनी 18 हजारांवर मताधिक्य घेतले.

त्यामुळे उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी जलमंदीर पॅलेसमध्ये जाऊन उदयनराजेंना खांद्यावर घेऊन जल्लोष केला. यावेळी उदयनराजेंना अश्रू अनावर झाले. तर पत्नी दमयंतीराजे या यशाने भारावून गेल्या.

सातारा लोकसभेच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत सकाळी मतमोजणीस सुरुवात झाल्यापासून शिंदे यांनी विजयाची आघाडी घेतली होती. त्यामुळे उदयनराजे समर्थकांत प्रचंड नाराजी पसरली होती. फेऱ्यानिहाय मताधिक्य वाढत गेले आणि नवव्या फेरीअखेर शशिकांत शिंदेनी १९ हजारांचे मताधिक्य घेतले होते. पण, त्यानंतर बाजी पलटली. सातारा, वाई आणि कराड उत्तर मतदारसंघाच्या मोजणीत उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंचे लीड तोडून मताधिक्य घेतले.

14 व्या फेरीनंतर उदयनराजेंनी एक हजारांचे मताधिक्य घेतले. त्यानंतर मताधिक्य वाढत गेले. 18 व्या फेरीअखेर 18 हजार पाचशेचे मताधिक्य मिळाल्यामुळे उदयनराजेंच्या समर्थकांनी जल्लोष सुरु केला. कार्यकर्ते थेट जलमंदिर पॅलेसवर पोहोचले आणि त्यांनी उदयनराजेंना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला.

त्यावेळी उदयनराजेंना या आनंदाश्रू आवरता आले नाहीत. तर दमयंतीराजेही भावूक झाल्या तर राजमाता कल्पनाराजे यांनी ही उदयनराजेंना सावरले. सर्वांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. सुरवातीला मताधिक्य मिळाल्याने जल्लोष करणारे शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांची मात्र, निराशा झाली.

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे चार आमदार असून पालकमंत्री शंभूराज देसाई व कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मकरंद पाटील यांचा समावेश आहे.

महाविकास आघाडीचे दोनच आमदार आहेत. यामध्ये बाळासाहेब पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे. महायुतीची ताकत मोठी असूनही साताऱ्यात शरद पवारांचाच करिष्मा चालल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. पवारांचा संघर्ष योद्धा शशिकांत शिंदेंनी आघाडी घेतल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्षात चैतन्याचे वातावरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT