Lok Sabha Election Result 2024 : भाजपला महाराष्ट्रात जोरदार झटका; चार मंत्री पिछाडीवर

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : महाराष्ट्रात भाजपचे चार मंत्री पिछाडीवर आहेत. यामध्ये तीन केंद्रीय मंत्री, तर राज्यातील एका मंत्र्याचा समावेश आहे.
Raosaheb Danve-Kapil Patil-Sudhir Mungantiwar-Bharti Pawar
Raosaheb Danve-Kapil Patil-Sudhir Mungantiwar-Bharti PawarSarkarnama

Lok Sabha Election Result Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी आठपासून सुरुवात झाली. अनेक मतदारसंघात आकडेवारी खाली वर होत आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपचे दिग्गज नेते पिछाडीवर पडले आहेत. त्यात काही केंद्रीय आणि राज्यातील मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपचे चार मंत्री पिछाडीवर आहेत. यामध्ये तीन केंद्रीय मंत्री, तर राज्यातील एका मंत्र्याचा समावेश आहे.

राज्यात लोकसभेची निवडणुकीत (Loksabha Election) भाजपपुढे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) मोठे आव्हान होते. ते स्पष्टपणे दिसून येत होते. त्याचे प्रतिबिंब मतमोजणीतून दिसून येत आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर दिसून येत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे २५ उमेदवार आघाडी दिसत आहेत. महायुतीला २२जागा दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या जालन्याकडे राज्याचे लक्ष लागले होते. जालन्यातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे सहाव्यांदा निवडणूक लढवत होते. रावसाहेब दानवे 6 हजार मतांनी पिछाडीवर पडले आहेत. त्यांना काँग्रेसकडून कल्याण काळे यांनी आव्हान दिले आहे. मात्र, अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्यामुळे काळे यांचे गणित बिघडू शकते.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या केंद्रीय मंत्री भारती पवार यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भगरे या नवख्या उमेदवाराने आव्हान दिले आहे. मात्र, केंद्रीय मंत्री भारती पवार ह्या आठव्या फेरीअखेर २२ हजार ४४९ मतांनी मागे आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार यांना कांदा निर्यातबंदीचा मुद्दा महागात पडण्याची शक्यता आहे.

Raosaheb Danve-Kapil Patil-Sudhir Mungantiwar-Bharti Pawar
Solapur Lok Sabha Election Result : सोलापुरात उलटफेर; भाजपचे राम सातपुते 6,314 मतांनी आघाडीवर

केंद्रीय मंत्री भारती पवार यांना आठव्या फेरीअखेर १ लाख ७१ हजार ३४२ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भगरे यांना १ लाख ९३ हजार ७९१ मते मिळाली आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना 87 हजार 931 मते पडली आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांना 1 लाख 04 हजार 183 मते मिळाली आहेत. अपक्ष निलेश सांबरे 53 हजार 589 मते मिळाली आहेत. भिवंडीत बाळ्यामाम म्हात्रे 16 हजार 252 मतांनी आघाडीवर आहेत.

राज्याच्या मंत्रिमंडळातील वन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांना काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांनी आव्हान दिले आहे. चंद्रपूरमधून पाचव्या फेरीअखेर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना 1 लाख 46 हजार 272 मते मिळाली आहेत.

भाजपचे उमेदवार तथा राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना 84 हजार 512 मते मिळाली आहेत. पाचव्या फेरीअखेर प्रतिभा धानोरकर या तब्बल 61 हजार 760 मतांनी आघाडीवर आहेत.

Raosaheb Danve-Kapil Patil-Sudhir Mungantiwar-Bharti Pawar
Parbhani Lok Sabha Election 2024 Result : परभणीत जानकरांची शिट्टी पिचली; ठाकरेंचा पठ्ठ्या दिल्लीच्या दिशेनं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com