Kopargaon Crime Issue : कोपरगाव, (ता. 3) प्रशासनावर वचक ठेवण्यात आमदार आशुतोष काळे अपयशी ठरले आहेत. कोपरगाव शहर व तालुक्यात अवैध धंदे व गुन्हेगारी वाढल्याची कबुली ते देत आहेत. शहरात सुरू असलेल्या चक्री बिंगोसह गोळीबार आणि नुकतीच उघडकीस आलेली सोने चोरी यात कुणाचे निकटवर्तीय आहेत, असा प्रश्न भाजपचे शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले की, खुलेआम जुगार, मटका अड्डे, अवैध दारू विक्री, तंबाखू-गुटखा विक्री, ऑनलाइन बेटिंग, वाळूचोरी आदी अवैध धंदे बिनदिक्कत सुरू आहेत. त्यामुळे तरुण वाईट मार्गाला लागत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोलिस गुन्हेगार आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करीत नाहीत, हे आमदार काळे (Ashutosh Kale) मान्य करीत आहेत. शहरात मारामाऱ्या करून दहशत करणारा पीए कुणाचा आहे? रेशन घोटाळ्यात कुणाच्या पदाधिकाऱ्यावर आरोप झाले आहेत? जुगार अड्डे कुणाच्या कार्यकर्त्यांचे आहेत, हे शोधल्यास उलटा चोर कोतवाल को डांटे, अशी स्थिती होईल.
राजकीय फायद्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे का? यापूर्वी नागरिकांनी याप्रश्नी आवाज उठविला तेव्हा ते उपमुख्यमंत्र्यांना का भेटले नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.