Chetansinh Kedar Sawant  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP District President : भाजप जिल्हाध्यक्षांची भरसभेत महिला पदाधिकाऱ्यांसमोर जीभ घसरली; ‘कशाला आई XXX...’

Sangola News : सांगोला पंचायत समिती भाजपच्या ताब्यात गेल्यानंतर सत्कार कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष चेतनसिंह सावंत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. महिलांची उपस्थिती लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच माफी मागितली.

Vijaykumar Dudhale

Solapur, 17 March : माजी आमदार दीपक साळुंखे समर्थक तीन सदस्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने सांगोला पंचायत समितीचा सभापती भाजपचा झाला. त्यानंतर झालेल्या सत्कार समारंभात बोलताना महिला पदाधिकाऱ्यांसमोरच भाजपचे जिल्हाध्यक्ष (पश्चिम) चेतनसिंह केदार सावंत भरसभेत शिवी दिली. माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यासपीठावर महिला असल्याचे खुणावले, त्यानंतर खजिल झालेल्या जिल्हाध्यक्ष महाशयांनी ‘स्वॉरी’ बघितलंच नाही म्हणत माफीही मागितली.

सांगोला (Sangola) पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतिपदी निवडीपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या तीन सदस्यांना गळाला लावत भारतीय जतना पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे बहुमतात असलेली शेकाप आणि साळुंखे यांची आघाडी अल्पमतात आली.

साळुंखे समर्थकांनी भाजपत प्रवेश केल्याने सांगोला पंचायत समितीवर पक्षाचा झेंडा फडकला. सभापतिपदी भाजपच्या पूनम इंगवले, तर उपसभापतिपदी शिवसेनेचे अजय सरगर यांची निवड झाली आहे. त्यांच्या सत्कार समारंभात बोलताना जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत () यांची गाडी सुसाट सुटली होती.

केदार सावंत म्हणाले, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच मी भाजपचं काम सुरू केलं होतं. मी जेव्हा भाजपत जायचा निर्णय घेतला, तेव्हा दीपक साळुंखेंनाही मी भाजपध्ये चला असं सांगितलं होतं. त्यांच्या कार्यालयात एक बैठकही घेतली होती. आपण सर्वजण मिळून भाजपमध्ये जाऊ, इथं (राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये) काही नाही राहिलं, असे त्यावेळी मी म्हटलं होतं.

दीपक साळुंखे त्या वेळी भाजपमध्ये आले असते तर आज ते खासदार झालेले दिसले असते आणि शहाजबापू आमदार राहिले असते. शहाजीबापूंनी ऐकलं, पण दीपक साळुंखेंनी ऐकलं नाही, त्यामुळे त्यांनी स्वतःचंही नुकसान करून घेतलं आणि बापूंचंही नुकसान केलं. आता पंचायत समितीच्या निमित्ताने एकत्र येण्याची परिस्थिती जुळून आलेली आहे, असेही केदार सावंत यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, तुमच्या सर्वांच्या समोर जाहीर करून टाकतो की, मला काय आमदार व्हायचं नाही. पण तुम्ही दोघांनी ठरवलं तर मी कुठंही आमदार होईल. तुम्ही दोघं अगोदर आमदार व्हा. (त्यावर शहाजीबापू पाटील यांनी तूलाच आमदार करायचं आहे, असं म्हटलं) मला नको.

दीपक साळुंखे आणि शहाजीबापू या दोघांना मी मघाशी म्हटलं, एवढा सगळा अट्टाहास करायचा होता, तर कशाला आई XXX आम्हाला कोटभर रुपये खर्चायला लावलं? केदार सावंत यांच्या तोंडून शिवी आल्याचे पाहताच शहाजीबापूंनी व्यासपीठावर महिला पदाधिकारी असल्याचे लक्षात आणू दिले. त्यानंतर त्यांनी ‘स्वॉरी बघितलंच नाही’, म्हणत माफीही मागितली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT