Balasaheb Patil, Dhairyashil Kadam sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Political News : माजी सहकारमंत्र्यांना रोखण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षांची खेळी

Dhairyashil kadam : कराड उत्तरमधील बाळासाहेब पाटील आणि धैर्यशील कदम यांच्या कारखान्यात ऊसदराची चढाओढ

Umesh Bambare-Patil

Karad Political News : राज्यात ऊसदराबाबत तीव्र आंदोलने सुरू असताना कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कारखानदाराकडून मात्र भलतीच शक्कल लढविली जात आहे. माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना रोखण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदमांनी चाल केली. त्यांच्या वर्धन अॅग्रो कारखान्याने चक्क 4 हजार रुपये ऊसदर जाहीर करून माजी सहकारमंत्र्यांच्या सह्याद्री कारखान्यास तोड दिली आहे. मात्र, यासाठी ऊस मालकाने ऊसतोडणी करायची आहे.

पश्चिम महाराष्ट्रात ऊसदरावरून शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात संघर्ष सुरू असून, अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात पहिली उचल 3100 रुपयांपर्यत साखर कारखाने दर देण्यास सकारात्मक असताना किमान 3400-3500 रुपये दर मिळावा, अशी मागणी शेतकरी संघटना करत आहेत.

अशावेळी वर्धन अॅग्रो कारखान्याने चक्क 4 हजार 111 दर दिला आहे. मात्र. यासाठी मालकाने ऊसतोडणी करायची असल्याची माहिती वर्धन अॅग्रोचे अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली आहे. माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सह्याद्री सहकारी साखर कारखानादेखील याच मतदारसंघात आहे. कराड उत्तरचे राजकारण याच कारखान्याभोवती फिरत असते.

त्यामुळे सह्याद्रीला टक्कर देण्यासाठी वर्धन अॅग्रो नेहमीच तयारीत असतो. मतदारसंघातील जनतेचे मतपरिवर्तन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला कदम यांनी हात घातला आहे. त्रिमली (घाटमाथा, ता. खटाव) येथे वर्धन अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेडच्या संचालकांची बैठक पार पडली.

या बैठकीस ज्येष्ठ संचालक भीमराव पाटील, संपतराव माने, भीमराव डांगे, सुदाम दीक्षित, सत्वशील कदम, सुनील पाटील, दीपक लिमकर, यशवंत चव्हाण, पृथ्वीराज निकम, अविनाश साळुंखे, सतीश सोलापुरे, दत्तात्रय साळुंखे, संतोष घाडगे, शरद चव्हाण, कार्यकारी संचालक कदम उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एक डिसेंबरनंतर गाळपास येणाऱ्या उसाची बिले पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. कारखाना परिसरातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी, ऊस पुरवठादारांनी आपला ऊस वर्धन कारखान्यास जास्तीतजास्त प्रमाणात द्यावा, असे आवाहन कदम यांनी केले आहे.

Edited By : Amol Sutar

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT