Solapur NCP : अजित पवारांंनी दिला एकनिष्ठ शिलेदाराला न्याय; दहा वर्षांची प्रतीक्षा संपली

Ajit Pawar Group News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी संतोष पवार यांची, तर कार्याध्यक्षपदी जुबेर बागवान यांची निवड
Santosh Pawar-Juber Bagwan
Santosh Pawar-Juber BagwanSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : क्षमता असूनही गेल्या अनेक वर्षांपासून हुलकावणी देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सोलापूर शहराध्यक्षपदी संतोष पवार यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या पवार यांना अखेर निष्ठेचे फळ मिळाले आहे. पवार यांच्याकडे शहराध्यक्षपद सोपवताना जुबेर बागवान यांची कार्यध्यक्षपदी निवड करत जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न अजित पवार गटाने सोलापुरात केला आहे. (Election of Santosh Pawar as Solapur city president of Ajit Pawar group of NCP)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदासाठी संतोष पवार, जुबेर बागवान यांच्यासोबत किसन जाधव हेही इच्छुक हाेते. किसन जाधव यांच्यासाठी मोहोळचे आमदार यशवंत माने हे आग्रही हाेते. जुबेर बागवान हे स्वतः अजितदादांना भेटून आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Santosh Pawar-Juber Bagwan
Ajit Pawar Group Leader Statement : ‘लोकसभेची काळजी तुम्ही करू नका; भावाला बहिणीची काळजी आहे...’

संतोष पवार हे तर पहिल्या दिवसापासूनच अजित पवारांशी एकनिष्ठ होते, त्यामुळे शहराध्यक्षपदाची धुरा कोणाच्या हाती द्यावी, याचे कोडे श्रेष्ठींना उलगडत नव्हते. शहराध्यक्षपदासाठी दोन वेळा बैठकाही झाल्या होत्या. मात्र, त्यात तोडगा निघत नव्हता. अखेर एक डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी संतोष पवार यांची शहराध्यक्षपदी, तर जुबेर बागवान यांच्याकडे कार्याध्यक्षपद सोपविण्याचा निर्णय घेतला.

संतोष पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश युवक उपाध्यक्ष, सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आदी पदांवर २०१० पासून काम केले आहे. मात्र, २०१३ पासून पवार यांना सोलापूर शहराचे अध्यक्षपद हुलकावणी देत होते. मात्र, तब्बल १० वर्षांनंतर अजितदादांवरील निष्ठा फळाला आणि शहराध्यक्षपदी पवार यांना संधी मिळाली आहे.

Santosh Pawar-Juber Bagwan
Baramati Loksabha : अजितदादांच्या बारामती लढविण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना सुळेंचे सूचक विधान; ‘माझ्या पोटात खूप गोष्टी...’

एकसंघ राष्ट्रवादी असताना अजित पवार यांच्या जवळचे असल्यामुळेच त्यांना शहराध्यक्षपदासाठी डावलण्यात येत असल्याची चर्चा त्यावेळी व्हायची. अजित पवार यांनी युती सरकारसोबत जाऊन उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला, त्याच दिवशी संतोष पवार आणि जुबेर बागवान यांनी अजितदादांना साथ देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे शरद पवार गटाकडून त्यांची पदे तातडीने काढून घेण्यात आली होती, पण अजित पवार यांनी आपल्या एकनिष्ठ शिलेदारांचा योग्य ती पदे देऊन सन्मान केला आहे.

Santosh Pawar-Juber Bagwan
Ajit Pawar Vs Jayant Patil : सोळंकेंना कार्याध्यक्षपदाचा शब्द मी नव्हे, अजितदादांनी दिला होता; जयंत पाटलांचा पलटवार

सोलापुरातील जातीय आणि सामाजिक समीकरणांचा विचार करून कार्याध्यक्षपदी जुबेर बागवान या तरुण कार्यकर्त्याला संधी दिली आहे. बागवान हेही अजितदादांशी पूर्वीपासून एकनिष्ठ राहिले आहेत. शरद पवार गटाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी २०१६ पासून म्हणजे गेली सात वर्षांपासून भारत जाधवच अध्यक्ष आहेत, पण अजित पवार गटाने तरुण रक्ताला वाव देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

Santosh Pawar-Juber Bagwan
NCP Karjat Shibir : प्रकाश सोळंकेंना राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाचा शब्द दिला होता; अजित पवारांचा गौप्यस्फोट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com