Shambhuraj Jagatap  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bjp Politics News : करमाळा तालुक्यातील माजी आमदार पुत्र भाजपमधून बडतर्फ; पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

Sachin Waghmare

Solapur News : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे पराभवाची कारणे भाजपकडून शोधली जात आहेत. त्यातच आता पक्षविरोधी काम केल्याचा ठपका करमाळा तालुक्यातील माजी आमदार यांच्या पुत्रावर ठेवण्यात आला आहे.

माढा लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे काम न केल्याचा आरोप करत ही कारवाई करण्यात आली. भारतीय जनता पार्टी युवा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर (Rahul Lonikar) यांनी ही कारवाई करत भाजपमधून बडतर्फ केले आहे. (Bjp Political News)

करमाळा तालुक्यातील माजी आमदार जयवंतराव जगताप (Jyanatrao Jagtap) यांचे पुत्र भाजपचे सोलापूर पश्चिमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी माढा मतदारसंघातून या निवडणुकीत भाजपचे काम न केल्याचा आरोप करत ही कारवाई करण्यात आली. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी त्यांना सोलापूर जिल्हा भाजपा (Bjp) युवा मोर्चा पदावरुन बडतर्फ केले आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना शंभूराजे जगताप म्हणाले, 'मला अजून कसलेच पत्र पक्षाकडून मिळालेले नाही. मला काही जणांकडून कळले आहे. ज्यांनी मला बडतर्फ केलंय त्यानं तर ते पत्र पोहचावे. मी पक्षाविरुद्ध काय काम केलंय? ते सांगावे. आजपर्यंत मी पक्षाच्या विरोधात काम केलेले नाही.

काही नेत्यांना मी जड जात होतो

लोकसभा निवडणुकीवेळी एका कार्यक्रमात प्रल्हादसिंह पटेल यांनी देखील माझे कौतुक केले होते. त्यामुळे मला वाटत पक्षाने मला बडतर्फ केलेले नाही. काही ठराविक नेत्यांनी त्यांना मी जड होत असेल, कदाचित मला असं वाटतंय, त्यांच्या भविष्यात मी अडथळा होऊ नये म्हणून बडतर्फ करण्यात आले असल्याचा दावा जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

दोघेही माझ्यासाठी रोड मॉडेल

आमदार रोहित पवार, खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे दोघेही माझ्यासाठी रोड मॉडेल आहेत. अनेक जणांना जगताप गटाने आमदार, खासदार केले आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप जे धोरण ठरवतील ते आम्ही 100 टक्के पाळणार असल्याचे शंभूराजे जगताप यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT