Bjp News : सर्व सहाचे सहा विधानसभा मतदारसंघ भाजपचेच; जागा वाटपावर बोलणारे कोहळे कोण?

Political News : रामटेक लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या दोन जागांवर अजित पवार गटाने दावा केला आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले आमदार आशिष जयस्वाल हे शिंदे गटात आहेत.
Sudhakar Kohale
Sudhakar KohaleSarkaranma

Nagpur News : रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मिळालेली मते ही फक्त भाजपचीच होती असा दावा करून भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा रोष ओढावून घेतला आहे.

भाजप (Bjp) एवढीच सशक्त होती तर लोकसभेत पराभव का झाला, भाजप आमदार असलेल्या एकाही विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य का मिळाले नाही ? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर केली जात आहे. खरे तर पराभवाची जबाबदारी नैतिक स्वीकारून त्यांनीच आधी राजीनामा देण्याची गरज असल्याची मागणी केली जात आहे. (Bjp News )

रामटेक लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या दोन जागांवर अजित पवार गटाने दावा केला आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले आमदार आशिष जयस्वाल हे शिंदे गटात आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला सोडावीच लागणार असल्याचे दिसते. यावर जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी आपले मत व्यक्त केले होते. ते म्हणाले, रामटेक लोकसभेत महायुतीचे उमेदवार (शिंदे सेना) राजू पारवे यांना मिळालेली मते ही भाजपची आहेत. हे बघता सर्व सहा विधानसभा मतदारसंघावर भाजपचाच हक्क आहे.

शिंदे सेनेचा जिल्ह्यात एकही आमदार नाही. अजित पवार गटाचा साधा सरपंचसुद्धा नाही. महायुतीला देण्यासारखे काहीच नसल्याने सर्व सहा मतदारसंघावर भाजपच लढणार असेही सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीचे (Ncp) पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच चिडले आहेत. भाजपला विजयाचा एवढाच आत्मविश्वास होता तर शिंदे सेनेसाठी लोकसभा का सोडली, आयात उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी का घेतली होती, अशी विचारणा केली जात आहे.

Sudhakar Kohale
Uddhav Thackeray News : मोठी बातमी! विधानपरिषदेतून रिटायर्ड झाल्यानंतर 24 तासांच्या आतच 'हे' आमदार पित्यासह ठाकरेंच्या भेटीला, शिंदेंना धक्का?

कामठी विधानसभा आणि हिंगणा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. विशेष म्हणजे कामठी हा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ आहे. दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्याम बर्वे यांना मोठे मताधिक्क्य आहे. भाजपच्या नेत्यांना स्वतःचे मतदारसंघसुद्धा सांभाळता आले नाही. कोहळे हे शहरातले आहेत. दक्षिण नागपूरचे आमदार होते. त्यांना भाजपने उमेदवारी नाकारली होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी तात्पुरते जिल्हाध्यक्षपद दिले आहे.

ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य किती आहेत याची प्रायमरी माहितीसुद्धा जिल्हाध्यक्षांना नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांकडे विधानसभेच्या जागांची मागणी केली आहे.

Sudhakar Kohale
Video Ajit Pawar : मध्य प्रदेशमध्ये गेम चेंजर ठरलेली योजना महाराष्ट्रात! 'लाडकी बहीण योजने'तून महिन्याला मिळणार दीड हजार रुपये

यावर भाजपच्या जिल्हाध्यक्षांना बोलण्याचा अधिकार नाही. जागा द्यायच्या की नाही हे आमचे व महायुतीचे वरिष्ठ नेते ठरवतील. कोहळे यांनी आपल्या दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाची चिंता करावी ? अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेचे कार्यकर्त्यांच्या आहेत. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम कोहळे यांनी करू नये असा सल्लाही त्यांना देण्यात आला.

Sudhakar Kohale
Uddha Thackeray यांनी BJP ची लायकीच काढली | BJP | Shivsena | NCP Splits | Sarkarnama Video |

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com