BJP News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP News: भाजप नेत्या अडचणीत? ऑडिओ क्लिप व्हायरल; 'उभा चिरून टाकीन...'

BJP leader Asha Buchake Allegations: एका युवकाला सरकारी गेस्ट हाऊसमध्ये बोलावून जबरदस्तीने चेक घेण्यात आला. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Sudesh Mitkar

Pune News: जुन्नर तालुक्यात भाजपच्या पदाधिकारी आशा बुचके यांच्यावर एका युवकाला पैशासाठी धमकावल्याचा आणि जबरदस्तीने चेक घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील ऑडिओ क्लिप समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

रोशन बिरमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांना बोलावण्यात आले. तेथे आशा बुचके यांनी पैशासाठी जबरदस्ती केल्याचा आणि पैसे दिले नाहीत तर “उभा चिरून टाकीन, जीभ हसडून टाकेन” अशा धमकीच्या भाषेत बोलल्याचा आरोप आहे.

ऑडिओमध्ये ही भाषा स्पष्ट ऐकू येत असल्याने, “लोकप्रतिनिधी की टोळीचा वसुली एजंट?” असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रोशन बिरमल यांनी सांगितले की, त्यांना सरकारी गेस्ट हाऊसमध्ये बोलावून जबरदस्तीने चेक घेण्यात आला. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी त्यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

आशा बुचके यांच्यावर यापूर्वीही विविध वाद आणि धक्काबुक्कीचे आरोप झाले होते. त्या पूर्वी शिवसेनेत सक्रिय होत्या आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. हा नवा आरोप त्यांना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात टाकणारा ठरला आहे.

पूर्वीचा वाद

शिवनेरीवरील एका कार्यक्रमादरम्यान आशा बुचके यांनी आमदार सोनवणे यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला होता. त्यानंतर त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना तात्काळत उभे करून स्वतः भाषण करण्यास सुरुवात केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT