Gopichand Padalkar met Amit Shah sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gopichand Padalkar : अमित शाहांची भेट घेऊन पडळकरांचा विशेष हट्ट, मोटाभाईंचाही होकार, नेमकं काय घडलं?

Gopichand Padalkar met Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांची अनेक नेत्यांनी भेट घेतली. अशातच भाजप नेते पडळकर यांनी देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पुण्यात भेट घेतली.

Aslam Shanedivan

Pune / Sangli News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी ते काही काळ पुण्यात होते. यावेळी त्यांची भाजप नेते पडळकर यांनी भेट घेतली. सध्या या भेटीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना ते 11 एप्रिलच्या रात्री पुण्यात दाखल झाले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अमित शाह यांची भेट घेतली. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मे महिन्यातील आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण अमित शाह यांना दिले. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावावी अशी विनंती केलीय.

पडळकरांच्या या मागणीला अमित शाह यांनी लगेच उपस्थित राहण्याचे वचन दिले असल्याची माहिती पडळकर यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये पडळकर यांनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असणाऱ्या हिमालयाच्या दृढतेची अनुभूती आज मिळाली. गृहमंत्री म्हणून त्यांनी कलम 370 हटवल्याचे म्हटले आहे.

तसेच CAA, NRC ची गरज या देशाला पटवून देण्यासह त्याची अंमलबजावणी देखील गृहमंत्री म्हणून त्यांनी केलीय. हे निर्णय फक्त शासकीय धोरणापुरते मर्यादित नसून हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या दिशेनं ठाम पाऊलं असल्याचेही पडळकर यांनी म्हटलं आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने भाजप व संघ परिवाराने देशभरात 12 हजार विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केलंय. अहिल्यादेवींनी ‘राष्ट्रप्रथम’ हा मंत्र मनी बाळगला. दौलतीपलीकडे जात राष्ट्र उभारणी केली. त्यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या पर्वावर आयोजित कार्यक्रमासाठी अमितभाई शाह यांची भेट घेतली. त्यांना आयोजित कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले. यावेळी त्यांनी तात्काळ होकार दिला.

यावेळी राज्याचे लोकप्रिय व लाडके आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पुण्यश्लोक अहिल्यामातेच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने आपला संकल्प बोलवून दाखवला. यंदाची जयंती अभूतपूर्व असेल याची ग्वाही देतो असे म्हणताना गोपीचंद पडळकर यांनी चांगभलं..., असे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT