
Sangli News : सोलापूरमध्ये 2021 साली भाजप आमदार तथा धनगर नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ला झाला होता. हा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घडवून आणल्याचा आरोप पडळकर यांनी केला होता. तर या षडयंत्रात खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश होता असा दावा पडळकर यांनी नुकताच केला होता. यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापलेलं होतं. अशातच आता जत प्रांत कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण करत या हल्लाप्रकरणी रोहित पवारांना सह आरोपी करावे. तसेच पडळकरांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी भाजप शहर अध्यक्ष अण्णा भिसे, चंद्रशेखर गोब्बी, माजी नगरसेवक परशुराम मोरे, गौतम ऐवाळे, राजू यादव, पापा कुंभार यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ रोहित पवार यांच्याकडून सुरू असलेल्या कटकारस्थानाचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. तसेच मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयात देण्यात आले.
गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या सोलापूर येथील जीवघेणे हल्याची फेर चौकशी करण्यात यावी, या हल्ल्याचा मुख्य सूत्रधाराचा पर्दा फार्श करण्यात यावा. या गुन्हात तो आरोपी आहे त्याचा शोध घ्यावा. पण त्याआधी या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या रोहीत पवार यांना आरोपी करावे, अशी मागणी केली आहे. तर आ. पडळकर यांच्या जीवीतास धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा द्यावी, अशी मागणी भाजपच्या जत शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
यावेळी शहराध्यक्ष आण्णा भिसे यांनी, आमदार गोपीचंद पडळकर महाराष्ट्रभर गोर गरीब जनतेचे प्रश्न, बहुजन समाजाचे प्रश्नावर आक्रमक पणे भुमिका मांडतात. ते जनतेला त्यांना न्याय देण्याचे काम करत आहेत. पण काही वर्षांपूर्वी पडळकर हे महाराष्ट्रात फिरत असताना त्यांच्या गाड्याचा ताफा अडविला जात होता. त्यांचा कार्यक्रमात निदर्शने आणि गाडीवर दगडफेक देखील झाली होती. ज्यातून ते बचावले होते. या षडयंत्रात रोहित पवार व सुप्रिया सुळे यांचा होत होता. त्यामुळे आता योग्य ती कारवाई केली जावी अशीही मागणी आता केली जातेय.
दरम्यान या हल्ल्याप्ररकरणी नुकताच पडळकर यांनी देखील विधान भवनात रोहित पवार व सुप्रिया सुळे यांचे नाव घेत टीका केली होती. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची फेरचौकशी करावी, रोहित पवारांना सहआरोपी करावे, अशी मागणी केली होती. तर हा दावा करताना, त्यांनी आपल्याकडे एक व्यक्ती पुरावा म्हणून आला होता. ज्याने रोहित पवार तरुणांना माझ्यावर हल्ला करण्यासाठी फितवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. तसेच रोहित पवार मारहाणीचे व्हिडिओ सादर करण्यासह ते पोस्ट करा, त्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घाला असेही चेतवत असल्याचे सांगितले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.