Sushilkumar Shinde-Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sushilkumar Shinde's Secret Blast : सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट; ‘लोकसभेला भाजप नेत्यांनीही प्रणिती शिंदेंना मदत केली’

Solapur Lok Sabha Constituency : भारतीय जनता पक्षातील कोणत्या नेत्याने प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली, अशी चर्चा आता सोलापूरमध्ये रंगू लागली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 07 July : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे कवित्व अजूनही सुरूच आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कृतज्ञता मेळाव्यात बोलताना ‘लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनीही प्रणिती शिंदे यांना मतदान केले’ असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे शिंदेंना मतदान करणारे भाजप नेते कोण, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde), तर भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते हे आमने सामने आले हेाते. या दोन्ही युवा आमदारांमध्ये लोकसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये (Solapur) काँटे की टक्कर झाली. त्यात प्रणिती शिंदे यांनी सुमारे ७४ हजार मतांनी भाजपचे राम सातपुते यांचा पराभव केला. तब्बल दहा वर्षांनंतर सोलापूरमध्ये काँग्रेस जिंकली आहे.

सोलापूरच्या जनतेने निवडून दिल्याबद्दल, तसेच मित्रपक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्याच्या वतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघात कृतज्ञता मेळावे घेतले जात आहेत. त्यात कृतज्ञता मेळाव्यात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कृतज्ञता मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठं विधान आहे. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीही प्रणिती शिंदे यांना मतदान केलं आहे. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो.

काँग्रेसच्या कृतज्ञता मेळाव्यात सुशीलकुमार शिंदे यांनी केलेलं विधान सोलापूरमध्ये राजकीय वातावरण तापवणारे ठरणार आहे. भारतीय जनता पक्षातील कोणत्या नेत्याने प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली, अशी चर्चा आता सोलापूरमध्ये रंगू लागली आहे. भाजपमध्येही आता एकमेकांकडे संशयाने पाहिले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT