Solapur Politics : सोलापूर शहर मध्य मतदारसंघाबाबत आडम मास्तर प्रचंड आशावादी;पण...

Narsayya Adam Mastar : सोलापूर शहर मध्य मतदारसंघ काँग्रेसने सोडला नाही तर, त्याबाबतचा निर्णय आमच्या पॉलिट ब्यूरोमध्ये होईल, त्यानुसार आमची पुढची दिशा ठरवली जाईल, असे आडम यांनी स्पष्ट केले.
Narsayya Adam Mastar
Narsayya Adam MastarSarkarnama

Solapur, 04 July : आघाडी धर्मानुसार सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सुटेल, असा आशावाद माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी बोलून दाखवला.

दरम्यान, सोलापूर शहर मध्य (Solapur City Central ) मतदारसंघ काँग्रेसने (Congress) सोडला नाही तर, त्याबाबतचा निर्णय आमच्या पॉलिट ब्यूरोमध्ये होईल, त्यानुसार आमची पुढची दिशा ठरवली जाईल, असे नरसय्या आडम मास्तर (Narsayya Adam Mastar ) यांनी स्पष्ट केले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जनतेचा कौल घेण्यासाठी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यात नरसय्या आडम यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह करण्यात आला होता. त्यानुसार आज माकपच्या वतीने आडम यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांची उमेदवारी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून आज जाहीर करण्यात आली. निवडणूक निधीसाठी माकपच्या वतीने आजपासून सोलापूरमध्ये ‘नोट भी दो वेट भी दो’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी सुमारे ४० हजार रुपयांचा निधी संकलित झाला आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघासह राज्यातील विधानसभेच्या १२ जागा मिळाव्यात, यासाठी माकपच्या शिष्टमंडळाने १५ जून रोजी शरद पवार यांची, तर काही दिवसांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भेट घेऊन चर्चा केली होती. लवकरच ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत.

Narsayya Adam Mastar
Radhakrishna Vikhe Patil : मुंबईत अधिवेशन, पण विखे पिता-पुत्र दिल्लीत जाऊन अमित शाहांना भेटले; 'विषय दूध दरवाढीचा, पण टार्गेट विधानसभा!'

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी माकपचे महासचिव कॉ. सीताराम येचुरी हे आघाडीच्या एकजुटीसाठी दिल्ली येथे भेट घेणार आहेत. त्या भेटीवेळी माजी आमदार नरसय्या आडमही येचुरी यांच्यासोबत असणार आहेत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघ आघाडीचा धर्म म्हणून महाविकास आघाडीकडून माकपला मिळण्याचे संकेत आहेत, असेही या वेळी आडम यांच्याकडून सांगण्यात आले.

काँग्रेसने सोलापूर शहर मध्य मतदारसंघ माकपला न सोडल्यास काय करणार, यावरही नरसय्या आडम यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, याबाबत निर्णय आमच्या दिल्लीतील केंद्रीय पॉलिट ब्यूरोमध्ये होईल. आमचे पॉलिट ब्यूरो जो निर्णय घेईल, त्यानुसार आमची पुढची वाटचाल असणार आहे.

Narsayya Adam Mastar
Narsayya Adam : प्रणितींच्या मतदारसंघात आडम मास्तर लागले विधासभेच्या तयारीला; माकपचे ‘नोट भी दो, वोट भी दो’ अभियान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com