Praniti Shinde-Subhash Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : भाजप नेत्याची प्रणिती शिंदेंना ऑफर; भविष्यातही त्यांनी पॉवरमध्येच राहावे

प्रणिती शिंदे यांनी सोलापूरची बाजू निर्धाराने मांडली आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur : गेल्या नऊ वर्षांपासून प्रणिती शिंदे आणि मी एकाच सभागृहात आहेत आणि त्यांनी सोलापूरची बाजू भक्कमपणे मांडली आहे. आजच्या पुरस्काराचे नाव आहे, ‘द पॉवर ऑफ सोलापूर’ याप्रमाणेच माझे मत आहे. भविष्यकाळातही पॉवरमध्येच आमदार प्रणिती शिंदे यांनी राहावं, तरच आमच्या सोलापूरची पॉवर वाढणार आहे, अशा शब्दांत दक्षिण सोलापूरचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी प्रणिती शिंदे यांना अप्रत्यक्षरित्या ऑफर दिली. (BJP leader's offer to Praniti Shinde: She should stay in power in future too)

सोलापुरात (Solapur) एका दैनिकाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार देशमुख (Subhash Deshmukh) हे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार राजन पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी सोलापूरची बाजू निर्धाराने मांडली आहे. मग कामगारांचा किंवा इतर कोणताही विषय असू त्या भक्कमपणे मांडत आल्या आहेत. आजच्या पुरस्काराचे नाव ‘द पॉवर ऑफ सोलापूर’ आहे. त्याप्रमाणेच माझे मत आहे की, भविष्यातही त्यांनी पॉवरमध्येच राहावं, तरच आमच्या सोलापूरची पॉवर वाढणार आहे.

पॉवरमध्ये राहण्यासाठी त्यासाठी कोणती शक्ती वापरायची, कोणती युक्ती वापरायचे ते वापरा, आपल्याला काही त्यातलं ज्ञान नाही, मात्र साहेबांचं (सुशीलकुमार शिंदे यांना) मार्गदर्शन तुम्हाला आहे. बहुतेक पुरस्काराचा हेतूही तोच असावा. तुमची पॉवर वाढावी, तुमची ताकद वाढावी, त्यासाठी तुमच्या पाठीमागे व्यासपीठावरील आम्ही सर्वजण आहोत.

मी जास्त काही बोलणार नाही, नाहीतर अजून काहीतरी बोललं जाईल. प्रणिती ताईंनी त्या प्रकारचे काम करावे, अशा आशावाद आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT