Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर बरखास्तीची टांगती तलवार आहे. संचालक मंडळावर होत असलेले गंभीर आरोप लक्षात घेत राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
दोन वर्षांपूर्वीच अस्तित्वात आलेल्या संचालक मंडळावर मागील काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत आहेत. त्यांच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश देऊनही दीड वर्षांहून अधिक काळ लोटला. मात्र अद्याप या चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. अशात थेट नगरविकास राज्य मंत्र्यांनीच संचालक मंडळ ‘बरखास्ती’ची मागणी केली आहे.
2002 साली पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते. या आरोपांमुळे पुणे बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर जवळपास 20 वर्षे प्रशासकांच्या माध्यमातूनच बाजार समितीचा कारभार चालवला गेला होता. त्यानंतर 2 वर्षांपूर्वी निवडणुका पार पडल्या.
यात भाजपप्रणित पॅनेलने राष्ट्रवादीप्रणित पॅनेलचा पराभव केला. पण नव्याने अस्तित्वात आलेल्या संचालक मंडळवरही अल्पावधीतच गंभीर आरोप होऊ लागले. सातत्याने होणाऱ्या आरोपानंतर 2023 मध्ये तत्कालीन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या कारभारावर चौकशीचे आदेश दिले होते.
त्यानंतर पणन संचालक विकास रसाळ यांनी मोहन निंबाळकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. आता या गोष्टीला तब्बल 2 वर्ष उलटल्यानंतर देखील अद्याप चौकशी अहवला समोर आलेला नाही. मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा संचालक मंडळावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनी जोर धरला आहे.
या पार्श्वभूमीवर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहिले आहे. यात पूर्वी प्रशासक असताना बाजार समितीचा कारभार सुरळीत चालत होता. पण संचालक मंडळ आल्यापासून नागरिक आणि व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर अनधिकृत विक्रेते, स्टॉल्स, दुकाने आणि अवैध होर्डिंग्जमुळे अडथळा निर्माण होत आहे.
कचरा व्यवस्थापनाचा अभाव असून परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. सुरक्षा रक्षक सामान्य नागरिकांशी उर्मटपणे वागतात. व्यापाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केला जातो, अशा पद्धतीचा तक्रारीचा पाढा वाचून मुख्यमंत्र्यांना नगर विकास राज्यमंत्र्यांनी संचालक मंडळ बरखास्त करण्याची गळ घातली आहे. त्यामुळे लवकरच बरखास्ता निर्णय होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.