Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti dispute : भाजपच्या सदस्य नोंदणीचा शिवसेना, राष्ट्रवादीनं घेतलाय धसका; 'एकला चलो'ची तयारी सुरू...

BJP Membership Drive Kolhapur Shiv Sena NCP Politics : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापुरात आल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सदस्य नोंदणीचे सूत्र दिले आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने युद्धपातळीवर सदस्य नोंदणीला प्रारंभ केला आहे. याचा धसका विरोधकांसह महायुती मधील शिवसेना आणि राष्ट्रवादीने देखील घेतला आहे. प्रथम स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढवायची घोषणा झाली असली तरी भाजपने केलेली तयारी पाहता तो स्वबळाच्या तयारीनेच यंत्रणा सुरू झाली आहे.

ऐनवेळी आपला पक्ष देखील मागे राहायला नको या तयारीने शिंदेंच्या सेनेने गुप्तपणे उमेदवारांची शोधा शोध सुरू केली आहे. तितक्यात ताकतीने आणि प्रभावी असलेला चेहरा शोधण्याचे कार्य सुरू केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापुरात आल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सदस्य नोंदणीचे सूत्र दिले. त्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकला चलो चे संकेत दिले.

सदस्य नोंदणी जो कार्यकर्ता आग्रही असेल त्यालाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आणि विधानसभा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची घोषणा बावनकुळे यांनी केली होती. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर भाजपला जिल्ह्यात देखील चांगले दिवस आले आहेत.

महापालिका जिल्हा परिषदेवर जास्त सदस्य संख्या निवडून आणण्यासाठी सदस्य नोंदणीचे महत्त्वाचे पाऊल आहे. मात्र त्यांच्या या सदस्य नोंदणीचा धसका काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यासह महायुती मधील शिवसेना राष्ट्रवादीने घेतला आहे. वरवर महायुती एकत्र दिसत असली तरी अंतर्गत युतीत तणाव आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कार्यकर्त्यांची मने दुभंगली असून उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या निवडणुका स्वबळावरच घेण्याची विनंती वरिष्ठ नेत्यांना केली आहे. त्यामुळे आता शिंदेंची शिवसेना देखील जय्यत तयारी करताना दिसत आहे.

न्यायालयाच्या निकालावरच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अवलंबून आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांची हालचाल दिसणार नाही. मात्र पक्षीय पातळीवर याच्या हालचाली जोरदार सुरू आहेत. निवडणूक आज लागू किंवा उद्या लागू पण पक्ष आणि कार्यकर्त्याला तत्पर ठेवण्यासाठी विविध फंडे वापरले जात आहेत.

शिंदेंच्या शिवसेनेत देखील स्वबळाच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू आहे. मतदारसंघातील प्रबळ सक्षम आणि त्याच ताकदीचा उमेदवार शोधण्याचा खेळ शिंदेंच्या शिवसेनेने गुप्तपणे सुरू केला आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे एकूण चार आमदार आहेत. त्यातील तीन शिवसेनेचे आणि सहयोगी पक्षाचा आमदार आहे.

शिवाय पालकमंत्री पद शिंदेंच्या शिवसेनेकडे असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्याचा फायदा होणार आहे. पालकमंत्री प्रकाश अबिटकर झाल्यापासून माजी खासदार संजय मंडलिक हे देखील आता आक्रमक झाले आहेत. पडद्यामागे राहून शहर सह ग्रामीण भागातील उमेदवारास शोधण्याचे काम मंडलिक करताना दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT