Jaykumar Gore 1 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP Minister Jaykumar Gore : माझ्या पाठीशी 'देवाभाऊ', कुणीही वाकडं करू शकत नाही; मंत्री गोरे यांचा विरोधकांना इशारा

BJP Minister Jaykumar Gore Pandharpur obscene photo controversy Maharashtra : अश्लील फोटो प्रकरणावरून भाजप मंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर इथून विरोधकांना इशारा दिला आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra Politics : अश्लील फोटो प्रकरणावरून भाजप मंत्री जयकुमार गोरे यांना विरोधकांनी चौहू बाजूने घेरले गेले आहेत. मंत्री गोरे यांना डिवचण्याची विरोधक कोणतीच संधी सोडत नाही. अशातच मंत्री गोरे यांनी देखील विरोधकांना आव्हान देताना दिसत आहे.

'माझ्या पाठीशी देवाभाऊ असल्यानं माझं कुणीही वाकडं करू शकत नाही', असे मंत्री गोरे यांनी विरोधकांना ठणकावले आहे.

भाजप (BJP) मंत्री गोरे यांच्या उपस्थित पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील पिलीव इथं शाखा उद्घाटन झाले. मंत्री गोरे यांनी या कार्यक्रमात विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली. मात्र, मंत्री गोरे यांच्या विधानानं विरोधक अधिकच आक्रमक होण्याची शक्यता आहे.

मंत्री गोरे म्हणाले, "जोपर्यंत माझ्या पाठीशी देवाभाऊ आहेत, तो पर्यंत माझं कुणीही वाकड करू शकत नाही. कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा. माय-माऊली आणि जनता माझ्यासोबत आहे". माझी एकही निवडणूक (Election), अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही, असेही मंत्री गोरे यांनी म्हटले.

'माझी एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही. मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले काही लोक सकाळ-सायंकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात आणि काळ्या बाहुल्या बांधत आलेत. मात्र जोपर्यंत जनता आणि माता भगिनी माझ्यासोबत आहेत तोपर्यंत तुम्ही कितीही पूजा आणि बाहुल्या बांधल्या, तरी माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही', असे जयकुमार गोरे यांनी ठणकावून सांगितले.

मंत्री गोरे यांचा मोहिते पाटील यांना 'दे धक्का'

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश पाटील, सरपंच नितीन मोहिते यांच्यासह मोहिते गटाचे शेकडो कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माढ्याचे माजी खासदार रणजीत निंबाळकर आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT