Maharashtra politics : राज्यात दररोज काहीतरी राजकीय उलथापालथ होत असते. सत्ताधारी अन् विरोधक कोणत्या ना कोणत्या निमित्ताने समोरासमोर येत आहेत. एकमेकांची भेट घेत आहे. या भेटीतून राजकीय गदारोळ होतो, हे मात्र निश्चित!
अशीच भेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची झाली. या भेटीवर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया देताना, जयंत पाटील अस्वस्थ असून, अधिवेशनाच्या काळात धक्का देणारी घटना समोर येईल, असे म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीवर मंत्री संजय शिरसाठ यांनी शिर्डीत (Shirdi) प्रतिक्रिया दिली. या दोघांनी अनेक वर्षे एका पक्षात काम केले आहे. काय करायचे, काय ठरवायचं यासाठी आजची बैठक महत्त्वपूर्ण आहे. कोणी कितीही नाकारले, तरी त्यांच्यात राजकीय चर्चा झालीच असणार आहे. जयंत पाटील हे त्यांच्या पक्षात अस्वस्थ आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. यातून अधिवेशनाच्या काळात देणारी घटना समोर येईल, असा दावा मंत्री शिरसाठ यांनी केला.
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात सुरू असलेल्या वादावर मंत्री शिरसाठ यांनी भाष्य केले. "कोणताही मुस्लिम (Muslim) औरंगजेबाची कबर ठेवा, असे म्हणत नाही. मात्र महाविकास आघाडीला त्याचा पुळका आलेला आहे. त्यांना औरंगजेबाची कबरीवर एवढे प्रेम असेल, तर त्यांनी त्यांच्या घरी ती कबर न्यावी", असा टोला लगावला.
नागपूरची दंगल ही पूर्वनियोजित होती. त्याचे पुरावे सापडले आहे, असा दावा मंत्री शिरसाठ यांनी केला. या दंगलीमागे महाराष्ट्रात अशांतता पसरवणे हा उद्देश होता. मुख्यमंत्र्यांनाही आम्ही कबर काढावी असे सांगितले आहे. यातून राज्यात वाढलेला जातीय दुरावा वाढणार नाही. कबर काढल्याने वातावरण आनंदी आणि शांत होईल, असा दावा मंत्री शिरसाठ यांनी केला आहे.
शिर्डी इथं होत असलेल्या वारकरी साहित्य संमेलनास 25 लाख रुपयांची मदत सामाजिक न्याय विभागाने दिली आहे, अशी माहिती देखील मंत्री संजय शिरसाठ यांनी दिली. राजसत्ता आणि धर्मसत्ता समन्वयाने समाजात अनुकूल बदल घडवण्याचे काम व्हावे, अशी अपेक्षा मंत्री शिरसाठ यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.