
Sushant Singh Rajput suicide : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने न्यायालयासमोर शनिवारी क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टनुसार सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे खरे कारण आत्महत्या असल्याचे सांगितले गेले आहे.
सुशांत सिंह राजपूत(Sushant Singh Rajput) 14 जून, 2020 रोजी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढला होता. प्रथम दर्शनी आत्महत्येची घटना वाटत होती, परंतु नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपवला गेला होता.
सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती, त्याला कोणीही मजबूर केले नव्हते, रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना क्लीनचीट मिळाली. कोणताही गुन्हेगारी अँगल किंवा षडयंत्र आढळले नाही. एम्स फॉरेन्सिक टीमनेही हत्येची शक्यता फेटाळली आहे. सोशल मीडियावरील चॅट्स अमेरिकेला पाठवून तपासणी केली गेली. मात्र त्यातही कोणतही छेडछाड झाल्याचा काहीच पुरावा मिळाला नाही.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू नंतर त्याचा कुटुंबीयांनी रिया चक्रवर्ती आणि अन्य जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा, फसवल्याचा, चोरी आणि बेकायदेशीरपणे बंधक बनवल्याचा आरोप केला होता आणि पाटणामध्ये एफआयआर दाखल केली होती. यानंतर बिहार आणि मुंबई पोलिसांमध्ये अधिकार क्षेत्रावरून वाद झाला होता. पुढे बिहार सरकारच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला मान्यता दिली होती. ज्यानंतर 19 ऑगस्ट 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला(CBI) या प्रकरणी संपूर्ण तपास करण्याचा अधिकार दिला होता.
एम्सच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी विष देणे आणि गळा घोटला गेल्याच्या शक्यता फेटाळल्या, सीबीआयने या रिपोर्टच्या आधारावर आपला तपास पूर्ण केला. आता न्यायालय ठरवेल की सीबीआयची रिपोर्ट मान्य करायचा का नाही.
सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट दाखल झाल्यानंतर सुशांतच्या कुटुंबाकडे एकमेव पर्याय आहे की मुंबई न्यायालयात निषेध याचिका दाखल करू शकतात. जर कुटुंबाला सीबीआयच्या रिपोर्टवर शंका आहे, तर ते न्यायालयातही दाद मागू शकतात.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.