kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगड येथे संचारबंदी प्रशासनाने पाच महिन्यांनंतर उठवली. ही संचारबंदी उठवताना काही नियम व अटी घातल्या होत्या. यानंतर आता पर्यटक गडावर जात आहेत. दरम्यान भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी सांगलीत गडावर कोणतेही धार्मिक उपक्रम होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत प्रशासनाला इशारा दिला होता. यानंतर शनिवारी (ता. ११) जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने येथे होणाऱ्या बाबा मलिक रेहान मीरासाहेब उरूसाला परवानगी नाकारली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर अनिधीकृत बांधकामे हटवावीत अशा मागणीसाठी येथे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन केले होते. ज्याला हिसंक वळण लागल्याने राज्य शासनाने पाच महिन्यांपूर्वी संचारबंदी लागू केली होती. अखेर जिल्हा प्रशासनाने शिथिल केली आहे. याबाबतचा अध्यादेश जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता.७) जारी केला आहे.
दरम्यान रविवारी (12 जानेवारी) किल्ले विशाळगडावर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे समोर आले आहे. यावर मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी (ता.१०)आक्रमक भूमिका घेतली.
त्यांनी, किल्ले विशाळगडावर उरूस भरवून हिंदू समाजाला चिथवण्याचे काम कोणी करू नये. विशाळगडावरील कायदा व सुव्यवस्था कोणीही खराब करू नये. शासन व सरकार म्हणून आम्ही यावर लक्ष ठेवून असल्याचे म्हटले होते. त्यांनी हा इशारा सांगली दौऱ्यावर असताना दिला होता.
यानंतर आता विशाळगडावर कोणताही जमाव जमू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने विशाळगडावरील धार्मिक कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. तसेच जोपर्यंत नियमानुसार अतिक्रमण संदर्भातली कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत गडावरती कोणतेही सण उत्सव साजरे करण्यास मनाई केली आहे. तर कोणताही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी परवानगी नाकारल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
विशाळगडावर नेमकं काय घडलं होतं?
गेल्या अनेक वर्षापासून विशाळगडावरील अनधिकृत बांधकामाविरोधात शिवप्रेमींनी आवाज उठवला होता. तसेच विशाळगड अनधिकृत बांधकाम मुक्त करावे, अशी मागणी केली होती. पण अनेकदा मागणी करूनही प्रशासन शांत होते. यामुळे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगड मुक्त आंदोलनाची घोषणा केली होती.
तर शेकडो कार्यकर्त्यांसह विशाळगडाकडे मोर्चा वळवला होता. दरम्यान या आंदोलनाला विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर गावात हिंसक वळण लागले होते. येथे अनेक रहिवाशी मुस्लिमांची घरे जमावाने लक्ष केले होते. यानंतर राज्य सरकारने विशाळगडावर संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे गेल्या पाच महिन्यापासून हा किल्ला पर्यटकांसाठी बंद होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.