VishalGad Curfew : पाच महिन्यांपासून विशाळगडावर संचारबंदी, स्थानिकांनी केली मोठी मागणी तर हिंदुत्ववादी संघटना म्हणतात...

Kolhapur News : गेल्या पाच महिन्यांपासून संचारबंदी कायम आहे. दरम्यान ही संचारबंदी शिथिल करून भाविकांची पुन्हा येजा सुरू करण्यात अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
Vishalgad violence
Vishalgad violence Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानंतर घडलेल्या हिंसाचारानंतर कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने गेल्या पाच महिन्यांपासून किल्ले विशाळगडावर (Vishalgad Violence) संचारबंदी लागू आहे. या संचारबंदीमुळे गडावर येणाऱ्या पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

दळणवळणाचे साधन सुविधा बंद झाल्याने स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने पोटापाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान, पाच महिन्यांपासून असलेली संचारबंदी उठवावी. व पूर्वीप्रमाणे बाबा मलिक रेहान मिरासाहेब यांचा उरूस पूर्वीप्रमाणे सुरू करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

किल्ले विशाळगडावरील उरूस पूर्ववत सुरू करावा या मागणीसाठी हजरत शेख अल्लाउद्दीन शहा कादरी उर्फ बाबा मलिक रहमान मिरासाहेब बहु उद्देशीय सामाजिक संस्थेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. 14 जुलै रोजी झालेल्या जातीय दंगलीनंतर जिल्हा पोलीस (Police) प्रशासनाकडून किल्ले विशाळगड आणि आजूबाजूच्या परिसरात संचारबंदी लागू केली आहे.

Vishalgad violence
Bjp News : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत भाजपच्या बड्या नेत्याने दिले 'हे' मोठे संकेत

हिंदुत्वादी संघटनाने मुसलमान वाडीवर हल्ला केल्यानंतर सामाजिक तेढचा मुद्दा निर्माण झाला होता. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनावतीने कडक निर्बंध लावून परिस्थिती पूर्वपदावर आणली होती. पण अद्यापही विशाळगडावर शुकशुकाट आहे. गड पायथा, केंबुर्णेवाडी येथील पोलिसांचा खडा पहारा बाहेरच्या व्यक्तीसह ग्रामस्थांना त्रासदायक ठरत आहे. गडावरील सर्वच व्यवहार बंद असल्याने गडवासीयांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. काही कुटुंबांनी या परिस्थितीत गड सोडला आहे. जनजीवन कधी पूर्वपदावर येणार? अशी माफक अपेक्षा रहिवाशांची आहे. 

मात्र त्यानंतरही गेल्या पाच महिन्यांपासून संचारबंदी कायम आहे. दरम्यान ही संचारबंदी शिथिल करून भाविकांची पुन्हा येजा सुरू करण्यात अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. विशाळगडावरील सर्वच व्यवहार बंद असल्याने तेथे वास्तव्याला असलेल्या व ज्यांचा उदरनिर्वाह पर्यटकांवर आहे,अशा छोट्या छोट्या व्यावसायिकांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. काही कुटुंबांनी या परिस्थितीत गड सोडला आहे. जनजीवन कधी पूर्वपदावर येणार? अशी माफक अपेक्षा रहिवाशांची आहे. 

Vishalgad violence
Sharad Pawar NCP: प्रचंड बहुमत असतानाही शरद पवारांचा 'हा' आमदार म्हणतो, 'महायुती सरकार तीन महिन्यांत कोसळणारच..!

दरम्यान, विशाळगड वासियांनी ही मागणी केल्यानंतर हिंदुत्वादी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. किल्ले विशाळगडावरील शंभर पैकी 90 जागांवरील अतिक्रमण राज्य सरकारने काढले आहे. उर्वरित अतिक्रमण देखील त्वरित काढावे अशी मागणी हिंदुत्वादी संघटनेने केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com