Shivendra Raje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivendra Raje Bhosale : शिवेंद्रराजे भोसले काँग्रेसवर कडाडले; म्हणाले, 'महाराजांना बदनाम करण्याचे षडयंत्र'

Shivendra Raje Bhosale on Congress Over Shivaji Maharaj And Sambhaji Maharaj : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरून वाद सुरू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापलेलं आहे.

Aslam Shanedivan

Satara News : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरून वादग्रस्त विधानं केली जातायत. याची सुरूवात सपा आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यानंतर झाली. त्यांनी याबाबत माफी मागितली. मात्र यांच्या या वक्तव्याचे अपडसाद आताही उमटत आहेत. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं असतानाच काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आगीत तेल ओतणारे वक्तव्य करत महायुतीवर निशाना साधला. त्याच टीकेला उत्तर भाजपचे नेते मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहे. काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा दावा करत शिवेंद्रराजे भोसले यांनी, काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसापासून छत्रपतींचा अपमान केला जातोय. यावरून जोरदार टीका झाली आहे. तर विरोधकांनी सरकारला घेरत सरकार अशावृत्तींना बळ देत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. 'औरंगजेब जेवढा क्रूर होता, तेवढंच क्रूरपणे महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार वागत आहे', असल्याचे विधान सपकाळ यांनी केलं होतं. यावरून आता नवा वाद सुरू झाला असून या टीकेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज घराण्यातील असलेले शिवेंद्रराजे भोसले यांनी उत्तर दिले आहे. तर छत्रपतींच्या बदनामीचं षडयंत्र काँग्रेस करत असल्याचा आरोप केला. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी काँग्रेसआधी राजकारणासाठी समाजामध्ये तेड निर्माण करतं आणि नंतर जातीयवाद पक्ष अशी ओरड करतो. पणम आता काँग्रेसचा खोटारडेपणा जनतेनं ओळखला पाहिजे. काँग्रेसकडूनच छत्रपतींच्या बदनामीचं षडयंत्र सुरू आहे. ज्याचा अभ्यास सर्वांना करायला हवा, असे त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसतच्या काळात फक्त छत्रपतींकडे दुर्लक्ष करण्याचे काम झाले. पण पंतप्रधान मोदींच्या काळात भाजपने छत्रपतींच्या इतिहासाला, गडकिल्ल्यांना किंवा छत्रपतींच्या ऐतिहासिक खुणा जपण्याचेच काम झाल्याचेही शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले आहे.

यावेळी त्यांनी कधीकाळी आपण सुद्धा काँग्रेसमध्येच होतो. आपले वडील काँग्रेसमध्ये होते. पण कधीच काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान केला नाही. त्यांचा इतिहास जेवढा समोर आणायला हवा होता तेवढा आणला नाही. त्यांच्या कार्याला लोकांपर्यंत पोहचवले नाही, असा दावा केला आहे.

याआधी देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदनामीवरून सपा आमदार अबू आझमींवर टीका केली होती. त्यांनी सध्याच्या या वादाला अबू आझमी कारणीभूत असून त्यांना छावा चित्रपटावर बोलण्याची गरज नव्हती अशी प्रतिक्रिया दिली होती.

तसेच शिवेंद्रराजे भोसले यांनी मंत्री नितेश राणेंच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम कोणीच नव्हते या वक्तव्यावर आपले सडेतोड उत्तर नोंदवले होते. तर याबाबत इतिहासात नोंद असून इतिहासकारांनी त्याच्या त्यांच्या पद्धतीने याची माहिती दिल्याचे म्हटले होते. तसेच या विषयावर वाद करण्याची गरज नसल्याचेही शिवेंद्रराजे भोसले म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT