Shivendra Raje Bhosale : "महाराष्ट्रात छत्रपती घाबरायला लागले, तर.."; ठाकरेंच्या आमदाराच्या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजेंनी दिलेलं 'ते' उत्तर चर्चेत

Shivendra Raje Bhosale vanity van comment : "मुंबई-गोवा हायवेचे 2011 पासून काम सुरू आहे. या कामास विलंब झाला आहे. कोकणातील बरेच लोक मुंबईस वास्तव्यास असून त्या ठिकाणी नोकरी-व्यवसाय करत आहेत. मुंबईकरांच्या दृष्टीने हा महत्वाचा महामार्ग आहे. राज्याच्या विकासात या मार्गाचा मोठा वाटा आहे."
Shivendra Raje Bhosale
Shivendra Raje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 13 Feb : "मी माझ्याच गाडीतून फिरतो, मला व्हॅनिटी व्हॅनची गरज नाही. महाराष्ट्रात छत्रपतीच घाबरायला लागले तर अवघड व्हायचं", असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामा संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केल्याचं सांगितलं.

Shivendra Raje Bhosale
BJP MLC News : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या नेत्याची विधानपरिषदेची संधी हुकणार का ?

ते म्हणाले, "मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai-Goa Highway) 2011 पासून काम सुरू आहे. या कामास विलंब झाला आहे. कोकणातील बरेच लोक मुंबईस वास्तव्यास असून त्या ठिकाणी नोकरी-व्यवसाय करत आहेत. मुंबईकरांच्या दृष्टीने हा महत्वाचा महामार्ग आहे. राज्याच्या विकासात या मार्गाचा मोठा वाटा आहे.

Shivendra Raje Bhosale
Santosh Deshmukh murder Case : राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची अधिवेशनाकडे पाठ; संतोष देशमुख प्रकरणावर सभागृहात चर्चा होणार का ?

मी स्वत: या महामार्गाची पाहणी केली. आता भास्करराव (Bhaskar Jadhav) व्हॅनिटी व्हॅन म्हणाले, पण मला त्याची गरज नाही. मी माझ्या स्वत:च्या गाडीतून फिरतो. यावेळी मी संपूर्ण हायवेची पाहणी केली. सर्व लोकप्रतिनिधींना भेटलो.

त्या दिवशी भास्कर जाधवांना पण भेटायचं होतं. घाबरायचा काही विषय नाही. महाराष्ट्रात छत्रपतीच घाबरायला लागले तर अवघड व्हायचं." तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असलेले मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती देखील त्यांनी सभागृहात दिली.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com