Shivendra Raje Bhosale on Rahul Gandhi : शिवजयंतीच्या उत्साहाला गालबोट लावण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला - शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendra Bhosale Criticizes Rahul Gandhi : ''शिवजयंती दिवशी ट्वीटमधून श्रध्दांजली वाहत असतील, तर हा मुद्दाम केलेला प्रकार की...'' ; असंही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संतापून म्हटलं आहे.
Shivendra Raje Bhosale on Rahul Gandhi
Shivendra Raje Bhosale on Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi Tweet on Shivjayanti : ''काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीटच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. शिवजयंतीदिनीच त्यांनी हा प्रकार मुद्दाम केला, की शिवभक्तांचा अपमान करण्यासाठी केला हे तपासले पाहिजे. स्वत:ची व्होट बॅंक जपण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न होत आहे. त्यामुळे छत्रपतींच्या घराण्याच्यावतीने आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जनतेने त्यांना घरी बसविले होते. आता त्यांना नारळ देऊन राजकारणातून रिटायर्डमेंट द्यायला हवी.'', अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राहुल गांधींच्या ट्वीटवर तीव्र प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी जयंतीदिनीच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या ट्वीटमुळे वातावरण तापलेलं आहे. यावरुन मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी त्यांच्या राहुल गांधींचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. ते म्हणाले, ''शिवजयंतीच्या आजच्या दिवशी राहुल गांधी यांच्या या ट्वीटमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जाव्यात हीच भावना त्यांची व काँग्रेस पक्षाची दिसते. शिवजयंतीच्या आजच्या उत्साहाच्या वातावरणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न राहूल गांधी यांनी केला आहे.''

Shivendra Raje Bhosale on Rahul Gandhi
Who is Rekha Gupta? : रेखा गुप्ता आहेत तरी कोण? ; दिल्लीत अडीच दशकानंतर सत्तेत आलेल्या भाजपने बनवलं मुख्यमंत्री!

तसेच ''शिवजयंती दिवशी ट्वीटमधून श्रध्दांजली वाहत असतील, तर हा मुद्दाम केलेला प्रकार की शिवभक्तांचा अपमान करण्याचा काँग्रेसचा प्रकार आहे का?'' असा प्रश्न करुन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ''इतक्या मोठ्या नेत्याला काय ट्वीट करावे, हेही कळत नाही. त्यांचे जे सल्लागार असतील त्यांना तरी बुद्धी पाहिजे की आपण काय ट्वीट करतोय. एकुणच हा प्रकार निंदनीय आहे. '' असं शिवेंद्रसिंहराजेंनी(Rahul Gandhi) म्हटलं.

Shivendra Raje Bhosale on Rahul Gandhi
Abu Azmi on Modi Muslim Relations : 'मोदी जगभरातील शेख, अमीर यांची गळाभेट घेतात, मग देशातील मुस्लिमांचाच द्वेष का?' ; अबू आझमींचा सवाल!

याचबरोबर ''काँग्रेसला(Congress) कधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम, निष्ठा, मराठी माणसाचा इतिहास बाहेर यावा असे वाटले नाही. त्यांनी ते कधी दाखविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यावर कळस म्हणजे राहुल गांधींचे आजचे ट्वीट आहे. आता जनतेने ठरविले पाहिजे की, त्यांना मागच्या निवडणुकीत घरी बसविले आहे. आता त्यांना नारळ देऊन राजकारणातून निवृत्ती द्यायला हवी.'' अशी टीका केली.

याशिवाय ''आज ते छत्रपतींविषयी बोलले आहेत. उद्या संभाजी महाराजांविषयी बोलतील, पुढे राजमाता जिजाऊबद्दल काँग्रेसचे नेते बोलतील. स्वत:ची व्होट बॅंक जपण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न यापूर्वी आणि आताही या माध्यमातून होत आहे. त्यामुळे छत्रपतींच्या घराण्याच्यावतीने आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो. ते आता पुन्हा सारवासारव करतील. पण, त्यांना असे व्टीट करताना कळायला हवे होते. शिवजयंतीच्या आजच्या दिवशी त्यांच्या या ट्वीटमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जाव्यात हीच भावना राहुल गांधी व काँग्रेसची दिसते.'' असा म्हणत मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी संताप व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com