MLA Jaykumar Gore With Supporters sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan Political News : टेंभूचे भूमिपूजन अन॒ जिहे कटापूरचे पाणीपूजन केल्याशिवाय निवडणूक लढविणार नाही : जयकुमार गोरे

Jaykumar Gore जिहे कटापूरच्या पाण्याच पूजन करण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची तारीख कधी मिळतेय त्याची वाट पाहतोय. त्यामुळे लवकरच पाणीपूजन होणार आहे, असेही जयकुमार गोरे म्हणाले.

Umesh Bambare-Patil

-विशाल गुंजवटे

Maan Political News : दहिवडी येथे विस्तारीत टेंभू प्रकल्पांतर्गत माण आणि खटाव तालुक्यातील एकूण 44 गावांच्या सिंचन सुविधेसाठी तब्बल ६८४ कोटींचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल खटाव, माणच्या जनतेच्यावतीने वाजतगाजत फटाक्यांच्या आतषबाजीत फुलांचा वर्षाव करत आमदार जयकुमार गोरे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore म्हणाले,टेंभूचे पाणी सातारा जिल्ह्याच आहे अन आमच भागल्याशिवाय ते पाणी आम्ही दुसऱ्यांना नेऊ देणार नाही, ही भूमिका घेऊन काम केल्यामुळे आज टेंभूचे पाणी आपल्याला मिळाले आहे. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांची खंबीर साथ मिळाली.माण खटाव मधील 44 गावांना टेंभू योजनेचे पाणी देण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2018 ला शब्द दिला होता.

त्याचा पाठपुरावा आपण कायम करत होतो. मात्र कृष्णा खोऱ्याच पाणी लवादाच वाटप झालेले होत. त्यात हा भाग येत नव्हता. त्यामुळे या भागाला पाणी आणणे खूप अवघड होत. मात्र या भागाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कृष्णा खोऱ्याचे पाणी लवादाचे फेर वाटप करावे, ही संकल्पना आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माण, खटावमधील 44 गावांसाठी टेंभू प्रकल्पांतर्गत अडीच टीएमसी तर माणच्या उत्तरेकडील 21 गावांसाठी जिहे कटापूरचे दीड टीएमसी पाणी फेरवाटपामुळे आरक्षित करण्यात आले आहे. त्यासाठी बजेटची तरतूद करून निधी ही टाकण्यात आला आहे. एका महिन्यात टेंडर निघून याही योजनेचे लवकरच भूमिपूजन केले जाणार आहे.अन जोपर्यतं जिहे कटापूरच पाणी हिंगणीत सुटत नाही अन टेंभूच्या पाण्याचे भूमिपूजन करत नाही, तोपर्यत आपण निवडणूक लढणार नाही हा माझा शब्द आहे, असे स्पष्ट मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.Maharashtra Political News

त्यांनी ही याबाबत या योजनांना पाठबळ देत सकारात्मक भूमिका घेत फेर वाटप करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळेच आज या योजना मार्गी लागल्या आहेत. आजपर्यंत जिल्हा ज्यांच्या भरोशावर होता त्याच पवार साहेबांनी माण, खटावला पृथ्वीच्याअंता पर्यंत पाणी देता येणार नाही, हे म्हसवडच्या सभेत सांगितले होते.

पण या दुष्काळी भागाला पाणी आणण्यासाठीच आपला जन्म झालाय हा संकल्प केला होता तो पूर्णत्वाकडे जातोय याचा मला गर्व नाही तर अभिमान आहे.डॉ.दिलीपराव येळगावकरांनीही त्यांच्या कार्यकाळात पाण्यासाठी खूप संघर्ष केलाय. या योजनांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत यास मान्यता देत तातडीने निधी दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सरकारचे आपण आभारी आहे, असे ही त्यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT