Gopichand Padalkar on jayant patil And vishwajeet kadam sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gopichand Padalkar : 'जतला माझा कोणी राजकीय शत्रू नाही, पण...'; गोपीचंद पडळकर यांचा रोख कोणाकडे?

Gopichand Padalkar on Jat : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यातील राज्यकर्त्यांवर प्रहार केला आहे. त्यांनी जत तालुक्यावर राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक अन्याय केला, असा आरोप केलाय.

Aslam Shanedivan

Sangli News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातील विकास कामांवरून पुन्हा एकदा प्रस्थापित राजकार्त्यांवर तोफ डागली आहे. त्यांनी येथील राज्यकर्त्यांनी जत तालुक्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला असा आरोप केला आहे. तर हा कायमचा संपवण्यासाठीच माझी लढाई आहे. 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जत तालुका नंदनवन करायचं आहे, यासाठी सर्वांनी माझ्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पाठीशी खंबीर उभं राहावे, असे आवाहन गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केले आहे. पडळकर यांनी उपप्रादेशिक कार्यालय मंजूर करून तालुक्याला ‘एमएच 59’ हा नवीन ओळख क्रमांक मिळवून केल्याबद्दल त्यांचा शहरातील विविध सामाजिक संघटनांनी सत्कार केला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी डॉ. मदन बोर्गीकर, सुभाष गोब्बी, सुभाष पाटील, परशुराम मोरे, अण्णा भिसे, राजू यादव, प्रकाश मोटे, रवी मानवर, विक्रम ताड, सुभाष कांबळे, बंटी नदाफ, प्रीतम हिट्टी आदींसह विविध सामाजिक, व्यापारी, वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

पडळकर यांनी, पुन्हा एकदा प्रस्थापित राज्यकर्त्यांवर टीकेची झोड उडवली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती पासून आतापर्यंतच्या जिल्ह्यातील नेत्यांनी जतवर अन्याय केला. पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही. येथे कायम दुष्काळ ठेवला. जो जतच्या वाट्याला जाणारा स्थानिक विकास निधीचा वाटाही आपल्या तालुक्यात पळवला असे म्हणत माजी पालकमंत्री जयंत पाटील, विश्वजीत कदम यांच्यासह जिल्ह्यातील इतर नेत्यांवर टीका केलीय.

या राज्यकर्त्यांना साधी नगरपरिषदेची इमारत मंजूर करता आली नाही. पंचायत समितीची इमारत अशीच आहे. या दोन्ही कार्यालयांच्या दोन्ही इमारती लवकरच मंजूर करून आणून, त्या इमारतीतून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असेही पडळकर यांनी स्पष्ट केले.

पडळकर म्हणाले, ‘सांगली येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयास कामानिमित्त जाताना उमदी, बालगाव, हळ्ळी येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे ही गैरसोय दूर करण्याचं मी निवडणुकीत आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे अधिवेशनात भूमिका घेतली. प्रस्तावही पाठवला. मात्र, येथे वाहन खरेदी कमी असल्याने तो मान्य करण्यात आला नाही. पण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून जतला ‘एमएच 59’ क्रमांकासह स्वतंत्र उपप्रादेशिक कार्यालय मंजूर केल्याचे पडळकर म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे शब्द पाळणारे नेते असून त्यांनी जो शब्द दिला तो पूर्ण होतोच. त्यामुळे या मतदारसंघाला काहीच कमी पडणार नाही. येथे कसलीच चिंता करण्याची गरज नाही. आपल्या जत शहराला ऐतिहासिक वारसा आहे. जो नव्याने आणि वेगळ्या धाटणीत बसवण्याचा माझा प्रयत्न आहे. 2029 पर्यंत सर्व कामे मार्गी लावून शहराला देखणं रूप देण्याचा आपला मानस असल्याचेही पडळकर यांनी म्हटलं आहे.

‘विस्तारित म्हैसाळ’च्या वितरिकेचे काम सध्या सुरू आहे. त्याला पर्यायी वाहिनी टाकण्यात येईल अशीही घोषणा पडळकर यांनी यावेळी केली. तर येत्या सात दिवसात याबाबत जलसंपदा विभागाची बैठकही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर याकामात मुख्यमंत्री फडणवीस नक्कीच मदत करतील. यामुळे 2027 पर्यंत जत तालुका दुष्काळमुक्त होईल, याची हमी देत आहे. केवळ घोषणाच करू प्रसिद्धी मिळावायची नाही. येथील जनतेचा अनेक वर्षांचा वनवास संपवायचा आहे. यासाठी वाटेल ते करण्यासाठी तयार असल्यचेही पडळकर यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT