Nitesh Rane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nitesh Rane : "मस्ती कराल, तर बायकोला फोन लागणार नाही, अशा जिल्ह्यात पाठवू"; नितेश राणेंनी पोलिसांना भरला दम

Akshay Sabale

Nitesh Rane Latest News : लव्ह जिहादच्या प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना फैलावर घेत इशारा दिला आहे. "पोलिस अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, सरकार हिंदुत्ववादी आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मस्ती कराल तर तुम्हाला अशा जिल्ह्यात पाठवू जिथे बायकोला फोनही लागणार नाही," असा दम आमदार नितेश राणे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना भरला आहे.

हिंदूंकडे वाकड्या नजरेने पाहायचे नाही, असंही आमदार राणे यांनी ठणकावून सांगितलं आहे. सांगलीच्या पलूस येथे आयोजित शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश मोर्च्यात बोलताना नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी हे विधान केलं आहे.

"लव्ह जिहादचे एखादे प्रकरण घडलं की, पोलिस वडिलांना मुलगी तुमचीच आहे ना? असा प्रश्न विचारतात. मात्र, तू ( पोलिस अधिकारी ) पण आमचाच आहे ना? की बाहेरून आणला आहे. आमचेच खातो ना? आमच्याच पगारावर राहतो ना?" असे सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केले आहेत.

"लव्ह जिहादचे एखादं प्रकरण घडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यास एक तास विलंब लावतात. मानव अधिकारचे लोक गेल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. पोलिस अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, सरकार हिंदुत्ववादी आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आहेत. मस्ती कराल तर तुम्हाला अशा जिल्ह्यात पाठवू जिथे बायकोला फोनही लागणार नाही," असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

"यापुढे अर्ध्या तासात गुन्हा दाखल झाला नाही, तर तीन तासांत नितेश राणे पोलिस ठाण्यात येऊन धिंगाणा घालेन. कुणालाही सोडणार नाही. धमकी देत बसणार नाही. आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आम्हाला मारलं जात आहे," असं नितेश राणे यांनी सांगितलं.

"एका व्यक्तीची मुलगी लव्ह जिहादमध्ये गेली. त्या मुलीचे वडील भेटले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू येते होते, बोलता येत नव्हतं. त्या मुलीच्या वडिलांची भावना समजून घ्या. पुन्हा हिंदूंमधील मुलींच्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू आले, तर त्यापेक्षा दुप्पट अश्रू तुमच्या डोळ्यातून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही. मी फक्त निवेदन देण्याचं काम करत नाही. थेट कार्यक्रम करतो. मी इकडे-तिकडे बघत नाही. जिथे जातो, तिकडे तयारीनं जातो. त्यामुळे कोणी माझ्या वाट्याला येत नाही," असं नितेश राणे म्हणाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT