Pravin Darekar uddhav thackeray  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pravin Darekar slams Uddhav Thackeray : सत्ता गेल्याने उद्धव ठाकरेंच्या पोटात मळमळ सुरू.. ; दरेकरांनी डिवचलं

Maharashtra Politics : त्यांनी ठाण्यात मराठी माणसांचा मेळावा घ्यायला हवा होता,

सरकारनामा ब्यूरो

Shirdi : शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (शनिवारी) ठाण्यात उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला. ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजप, शिंदे गटावर टीकास्त्र डागले. भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला आहे. दरेकर शिर्डीत पत्रकारांशी बोलत होते. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात देशातील जनतेबाबत तळमळ आहे तर सत्ता गेल्याने उद्धव ठाकरेंच्या पोटात मळमळ सुरु आहे," असा घणाघात दरेकरांनी ठाकरेंवर केला.

दरेकर म्हणाले, "उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. ठाण्यातील त्यांचं भाषण प्रभावहीन आणि भटकटलेलं होतं. त्यांनी ठाण्यात मराठी माणसांचा मेळावा घ्यायला हवा होता, पण मराठी माणसं जमतील की नाही याची भिती त्यांना होती. मराठी माणसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांनी उत्तर भारतीयांनी यापूर्वी काय वागणूक दिली ते देशवासियांनी पाहिले आहे. आता मतांच्या लाचारीसाठी हे सगळं करीत आहेत,"

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर दरेकर म्हणाले, "भिडे यांच्या विधानामुळे भाजप अडचणीत येणार नाही, कारण संभाजी भिडे आमच्या पक्षाचे सदस्य किंवा पदाधिकारी नाहीत. ते एक प्रतिष्ठान चालवतात,"

विरोधीपक्ष नेता कोण होणार यावर काँग्रेसमध्ये सध्या चर्चा सुरु आहे. त्यावर दरेकर म्हणाले, "विरोधीपक्षनेता ठरवू शकत नाही ही काँग्रेसची हतबलता आहे.जे स्वतःचा विरोधी पक्षनेता ठरवू शकत नाही ते २४ जागा कशा जिंकणार? त्यांच्या पक्षातच एकमत आणि समन्वय नाही. ज्या दिवशी विरोधी पक्षनेता ठरेल त्या दिवशी काँग्रेसमध्ये स्फोट होईल," "काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहे," असेही दरेकर म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT