Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama

Prithviraj Chavan Threatening Email : संभाजी भिडेंबाबत विधानसभेत विचारलेल्या प्रश्नामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी

Maharashtra Politics : कराड येथे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on

Karad News : संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या विरोधात विधीमंडळ अधिवेशनात कारवाईची मागणी काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. या घटनेनंतर चव्हाण यांना ई-मेल व्दारे धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

अंकुश सौरते असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ई-मेलचा आयपी अॅड्रेस हा नांदेड येथील आहे. याप्रकरणी कराड, नांदेडमध्ये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Prithviraj Chavan
Ghosapuri Water Supply Scheme : 'घोसपुरी'चे पाणी पेटणार ; महाविकास आघाडी-भाजपमधील वाद चिघळणार !

संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. भिडेंनी महात्मा गांधी यांच्यावर टीका केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. भिडेंवर तातडीनं कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करून कारवाई करू असे सांगितले.

Prithviraj Chavan
Rahul Gandhi Marriage : राहुल गांधी लग्न कधी करणार ? शेतकरी महिलेच्या प्रश्नावर सोनिया गांधी म्हणाल्या, " तुम्हीच मुलगी शोधा"

काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकुर, आमदार कुणाल पाटील यांनीही भिडेंच्या विरोधात आंदोलन केले. राज्यात विविध ठिकाणी भिडेंच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत. अमरावतीत यशोमती ठाकूर यांनी भिडेंच्या विरोधात आंदोलन केलं होतं, त्याला प्रत्युत्तर म्हणून भिडे समर्थकांनी अमरावतीच्या कोतवाली पोलीस ठाण्यात आंदोलन करीत यशोमती ठाकूर यांना अटक करण्याची मागणी केली आहे. याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com