Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंना थेट ऑफर!; भाजप आमदाराच्या विधानाने राज्यभर चर्चा

Bjp Mla On Cm Eknath Shinde : नगरमध्ये झालेल्या सभेत भारतीय जनता पक्षाचे आमदार टी. राजासिंह यांनी मोठे विधान केले आहे...

Sachin Fulpagare

Maharashtra Politics News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत भाजप आमदाराने केलेल्या एका विधानाने राज्यभर चर्चांना उधाण आले आहे. तेलंगणातील भाजप आमदार टी. राजासिंह यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री शिंदे यांना भाजप प्रवेशाचे आमंत्रण दिले आहे.

'मुख्यमंत्री तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य आहात. त्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला, कसे हिंदू व्हायचे आहे. देशाच्या सेवेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडा, धर्म प्रचारासाठी विश्व हिंदू परिषदेत या. देशद्रोही, आतंकवादी, गो-हत्या करणाऱ्यांना ठोकायचे असेल, तर बजरंग दलात या', असे खुले आमंत्रण आमदार टी. राजासिंह यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे आणि विश्व हिंदू परिषदेला ६० वर्षांची पूर्तीनिमित्ताने सभेचे आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने ही सभा आयोजित केली होती. सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. सभेच्या पटांगणाभोवती भगवे ध्वज उभारण्यात आले होते. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होता. सभास्थळाकडे जाताना प्रत्येकाला भगवी टोपी दिली जात होती.

टी. राजासिंह हे भाषण करताना युवकांकडून प्रतिसाद घेत होते. व्यासपीठासमोरील गर्दीला प्रश्न विचारत होते. 'अफजलखान याची कबर जशी उद्ध्वस्त केली, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे एकाची कबर उद्ध्वस्त करायची आहे. ती मुख्यमंत्र्यांनी उखडून टाकावी. या लढाईत तुमच्याबरोबर करोडो हिंदू येतील. हे अफझलखानाचे वंशज आहे. ते पाठीतच खंजीर खुपसणार. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना ज्यांनी वेदना देत मारले, त्याची कबर महाराष्ट्राच्या जमिनीवर नकोच म्हणून व्होट बॅंकेत गुंतून पडू नका', असे आवाहन टी. राजासिंह यांनी मुख्यमंत्र्यांना केले.

भारत हिंदू राष्ट्र घोषित झाले पाहिजे

'हिंदू संघटित झाल्यावर इतिहास रचतो. अयोध्येत भव्य राम मंदिर साकारले जात आहे. कश्मीरमध्ये कलम ३७० हटवले. काशी, मथुरामध्येदेखील भव्य मंदिर उभारले जाणार आहेत. यासाठी विश्व हिंदू परिषदेबरोबर बजरंग दल देशभर काम करत आहे. भारत आता एक हिंदू राष्ट्र घोषित झाला पाहिजे. याची घोषणा २०२६ अगोदर होईल. एवढेच नव्हे तर लव जिहाद होणार नाही. गो-हत्या करणाऱ्यांना उलटे केले जाईल', असा इशारा या वेळी आमदार टी. राजासिंह यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तसेच भाजप हे एकमेकांशी जोडलेल्या संघटना आहे. आमदार टी. राजासिंह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या तीन संघटनांपैकी कशातही यावे, असे जाहीर आवाहन केले आहे.

टी. राजासिंह यांनी या वेळी भाजपचे नाव घेतले नाही. महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गट महायुतीत भाजपबरोबर आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात शिवसेना पक्ष तसेच चिन्हासाठी सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्षकांकडे सुरू होत आहे. निकालाची प्रतीक्षा आहे. यातच भाजप आमदार टी. राजासिंह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संघटनांच्या नावाखाली भाजपमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिल्याचे बोलले जात आहे. हे आमंत्रण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपकडून कोंडी करण्याचा प्रयत्न, तर नाही ना? असेही बोलले जात आहे.

लोकसभेची चाचपणी

भाजप आमदार टी. राजासिंह यांच्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा होत आहे. या सभा भाजपशी निगडित असलेल्या विविध संघटनांच्या माध्यमातून होत आहे. टी. राजासिंह यांच्या या सभा भाजपची लोकसभेची चाचपणी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. नगरमधील सभा हा त्याचाच भाग आहे. पूर्वी या चाचपणी महाराष्ट्रातील खासदार आणि आमदार यांना वेगवेगळ्या मतदारसंघात पाठवून व्हायच्या. यातून रोष निर्माण व्हायचा. तो टाळण्यासाठी आता इतर राज्यातील नेते महाराष्ट्रात पाठवले जात असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT