Prajakt Tanpure News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दिली 'ही' उपमा; घालणार जागरण गोंधळ

NCP Protest News : ते उद्या राहुरीच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करणार....
Prajakt Tanpure
Prajakt TanpureSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : विरोधात असलेल्या आमदारांचा मंजूर निधी मिळत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस आमदारांचा रोष लपून राहिलेला नाही. हा मंजूर निधी मिळावा, यासाठी अनेकजण कोर्टात गेले.

आता राहुरीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे चिडले असून, त्यांनी विद्यमान महायुती सरकारच्या धिम्याकामाचा आरोप करत थेट गतिमंद सरकारची उपमा दिली आहे.

Prajakt Tanpure
Shinde-Fadnavis-Pawar Government: बळीराजासाठी खूष खबर! राज्य सरकारचे दिवाळीआधीच आणखी एक 'गिफ्ट'

आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या नेतृत्वाखाली मंजूर कामांना कार्यारंभ आदेश मिळत नसल्याने तहसील कार्यालयासमोर जागरण गोंधळही घातला जाणार आहे. ते उद्या राहुरीच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करणार आहेत.

या आंदोलनावेळी या 'गतिमंद' सरकारला जाग यावी म्हणून आमदार तनपुरे जागरण गोंधळही घालणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राहुरी तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या रस्त्यांच्या कामांना तसेच तलाठी कार्यालयांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यास होत विलंब होत आहे.

त्याचमुळे सरकारच्या विरोधात आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राहुरी- मांजरी रस्त्यावर आरडगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

त्यावेळी तहसीलदार यांच्या उपस्थितीत पंतप्रधान ग्रामसडक विभागाचे उपभियंता एस. जी. गायकवाड यांनी सदर कामे १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरू करू असे सांगितले होते.(Shinde-Fadnavis-Pawar Government)

उपअभियंत्यांनी आश्वासन देऊन एक महिना होत आला तरी या कामांचा कार्यारंभ आदेश प्राप्त न झाल्याने राज्यातील सरकार हे गतिमंद सरकार असल्याचा उपरोधिक टोला आमदार तनपुरे यांनी लावला. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन व जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे. (NCP Protest News)

(Edited By Deepak Kulkarni)

Prajakt Tanpure
Malegaon Sugar Factory News : मदननाना देवकातेंची नाराजी कायम; माळेगावच्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात काय घडलं ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com