Eknath Shinde Dhananjay Mahadik satej patil hasan mushrif .png Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Mahadik: विधानसभेला केलेली 10-0 ही भविष्यवाणी खरी ठरली; आता मुन्ना महाडिकांनी 'स्थानिक'चा निकालच सांगून टाकला

Kolhapur Local Body Elections: महाराष्ट्रात आठ ते दहा वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. बऱ्याच वर्षांनी निवडणुका होत आहेत त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. पक्षांची संख्या अधिक असल्याने लोकांकडे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत, त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात मोठी भविष्यवाणी केली होती. ती अगदी खरी ठरली होती. तीच आठवण सांगताना आता महाडिक म्हणाले, गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात मी एकमेव असा नेता होतो प्रसार माध्यम आणि जाहीर सभांमध्ये जिल्ह्यात महायुतीचा निकाल 10- 0 असा होणार हे सांगितलं होतं. त्याच पद्धतीचा कौल जिल्ह्यातील जनतेने आम्हाला दिल्याचं धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी आवर्जून सांगितलं.

आताही कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा ठिकाणी लागलेल्या निवडणुकीत महायुतीचेच नगराध्यक्ष होतील, युतीलाच बहुमत असेल. काँग्रेसचे कुठे निवडून येईल असं मला वाटत नाही. निवडून येण्याचं काही कारणही नाही, कारण अनेक वर्ष ते सत्तेत होते, यावेळी त्यांच्याकडून फारसं उठावदार काम झालं नसल्याचा आरोप महाडिक यांनी केला.

केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार असल्यामुळे लोकांना ही विश्वास आहे. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडूनच काम होतील म्हणून या निवडणुकीतही युतीलाच स्पष्ट बहुमत मिळेल. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीत 13-0 असाच स्ट्राईक रेट युतीचा राहणार आहे, महायुतीच्या नगराध्यक्ष आणि सगळ्या जागा निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे, असा दावा राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात केला आहे.

महाराष्ट्रात आठ ते दहा वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. बऱ्याच वर्षांनी निवडणुका होत आहेत त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. पक्षांची संख्या अधिक असल्याने लोकांकडे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत, त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिकच्या निवडणुका जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून लढणार आहोत. कोल्हापूर जिल्हाही त्याला अपवाद नाही. जिल्ह्यात आठ ठिकाणी भाजपशी निगडित नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आम्ही उभा करत करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

वरिष्ठांच्या आदेशानुसार बहुतांश ठिकाणी महायुती आहे. महायुती म्हणून लढण्याचा प्रयत्न करत आहोत, महाराष्ट्रात प्रथमच चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत.यामुळे आमदार शिवाजी पाटील नाराज झाले आहेत. मात्र, या ठिकाणी आम्ही चांगली बांधणी करून नगराध्यक्ष पदासाठी आमचाच उमेदवार निवडून येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं.

कोल्हापूर महापालिकेत 35 जागा आमच्या मूळच्या आहेत, महापालिकेत राष्ट्रवादी-शिवसेना आणि आम्ही एकत्र लढणार आहोत. पूर्वीच्या जागांपैकी 29 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार होते. या जागांमध्ये वाटणी होईल, यामध्ये काही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून या जागा लढवल्या जातील. 35 या हा आमचा बेसिक आकडा आहे. यामध्ये वाढ होऊन 40 ते 45 जागांवर आम्ही लढणार आहोत, याबाबत महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असेही महाडिक म्हणाले.

बास्केट ब्रिजचा प्रकल्प मी मंजूर करून आणला त्यासाठी निधीही आणला आहे. मध्यंतरी महाविकास आघाडीच्या काळात हा प्रकल्प रद्द करण्याचा प्रयत्न झाला. मात्र माझं नशीब बलवत्तर आहे. 2022 मध्ये पुन्हा राज्यसभेवर संधी मिळाली. 2024 मध्ये लोकांच्या विचाराचा सरकार च्या कार्यरत झालं आता हा प्रकल्प पुन्हा पुनर्जीवित करण्यात आला आहे. पूर्वी हा प्रोजेक्ट 170 कोटींचा होता, आता तो 780 कोटींचा झाला आहे.

कोल्हापूरच्या स्वागताला अतिशय देखणा रस्ता होणार आहे. मुंबईच्या सीलिंग प्रमाणे कोल्हापूरचा बास्केट ब्रिज होणार आहे, लोक हा ब्रिज पहायसाठी कोल्हापूरला येतील, त्या पद्धतीचे डिझाईन झालं आहे. बास्केट ब्रिजचं लँडिंग साधारणता जकात नाका आणि मार्केट कमिटीच्या कमानी दरम्यान होईल, त्यानंतरच कोल्हापूरच्या स्वागत कमानीच काम केलं पाहिजे.

बास्केट ब्रिज चे काम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरला सुंदर देखणी स्वागत कमान करण्यात येईल ज्या पद्धतीने कोल्हापूर विमानतळाला हेरिटेज लुक दिला आहे. त्याच पद्धतीने कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराला लुक असला पाहिजे यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT