Pune News : महापालिकेच्या विकास कामांचे वाभाडे काढत खासदार मेधा कुलकर्णी यांनी मागील टर्ममध्ये पालिकेच्या सत्तेत असलेल्या भाजपला घरचा आहेर दिला आहे. विकास कामांवरून मेधा कुलकर्णी यांनी टीका करून घरचा आहेर भाजपच्या नेतृत्वाला दिला असला तरी त्यामुळे मात्र काँग्रेस नेत्यांच्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत असल्याचं पाहायला मिळत आहे. मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या टीकेमुळे आता आम्हाला टीका करण्याची गरजच नाही, असंही मत माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे. (BJP MP Medha Kulkarni criticizes Pune civic works from last term, Congress leaders welcome the remarks)
गेल्या दहा वर्षात पुण्याचा विकास शून्य झाल्याची कबुली खासदार कुलकर्णी यांनी दिली असून पुण्यात रहावेसे वाटत नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. विकास खुंटल्याने पुणे नकोसे झाले असे सांगून त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. भाजपच्या दिशाहीन आणि निष्क्रिय कारभारावर विरोधी पक्षांनी टीका करायची गरज उरलेली नाही, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.
भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाजावाजा केलेली स्मार्ट सिटी योजना पुण्यासह देशभर फसली आहे. मुठा नदी सुधार नदी योजनेची वीट सुद्धा हललेली नाही, असे भाजपचे नेते बोलत असतात. रस्ते, स्वच्छता आदी नागरी सुविधा कोलमडलेल्या आहेत. रस्ते चांगले नसल्याने छोटे मोठे अपघात होत आहेत. त्यात तरुणांचा बळी गेल्याच्या घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. त्याचे गांभीर्य भाजप नेत्यांच्या वागणुकीत दिसत नाही.
पीएमपीएमएलच्या बसगाड्यांच्या ताफ्यात नव्याने भर घालणेही भाजपच्या नेत्यांना गेल्या पाच वर्षांत जमलेले नाही. पीएमपीएमएलच्या प्रवाशांना दररोज मनःस्ताप सहन करावा लागतो. फक्त निवडणुका जिंकण्यासाठी डावपेच, उथळ कार्यक्रम यात भाजपचे खासदार आमदार मश्गूल आहेत. पुणेकरांनी भाजपला भरभरून मते दिली पण नेते मस्तीत राहिले, असे मोहन जोशी म्हणाले.
पुण्याच्या या अवस्थेला प्रशासन जबाबदार नसून त्यावर नियंत्रण ठेवणारे भाजपचे मंत्री, खासदार, आमदार जबाबदार आहेत. मेट्रो, अंतर्गत वर्तुळाकार मार्ग, शहराभोवतीचा रिंग रोड यात मोठ्या घोषणा मुख्य मंत्र्यांनी केल्या अंमलबजावणी काही नाही. मेट्रोचे काम गतीने होत नाही, याकडेही मोहन जोशी यांनी लक्ष वेधले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पुणेकर भाजपला धडा शिकवल्या शिवाय रहाणार नाहीत, अशीही टीका देखील त्यानी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.