Medha Kulkarni: मोठी बातमी: पुणे रेल्वे स्थानकाचं नाव बदलणार? भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी सुचवलं 'हे' नाव

Pune Railway Station Name Change पुणे शहरामध्ये हिंदुत्वाचा चेहरा म्हणून मेधा कुलकर्णी समोर येताना दिसून येत आहेत. अशातच त्यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा छेडला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Pune Junctiion Medha Kulkarni  .jpg
Pune Junctiion Medha Kulkarni .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : केंद्रातील मोदी सरकारनं महत्त्वाच्या शहराच्या नामांतराचा धडाका लावल्यानंतर महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महायुती सरकारनं औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांचं नामांतर केलं. आता पुण्याच्या नामांतराची मागणी होऊ लागली आहे. आता पुणे रेल्वे स्थानकाचं नाव थोरले बाजीराव पेशवे करण्यात यावं, अशी मागणी भाजपच्या महिला खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी केली आहे.

भाजपकडून राज्यसभेची संधी देण्यात आलेल्या मेधा कुलकर्णी यांनी गेल्या काही महिन्यांपासून हिंदुत्व, लव्ह जिहाद, अतिक्रमण हटाव यांसारख्या विविध मुद्द्यांवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे शहरामध्ये हिंदुत्वाचा चेहरा म्हणून मेधा कुलकर्णी समोर येताना दिसून येत आहेत. अशातच त्यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा छेडला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी कराडच्या यशवंत सहकारी बँकेतील सुमारे 140 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजप नेते शेखर चरेगावकर यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी त्यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेत त्यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केल्याचंही सांगितलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून मेधा कुलकर्णी यांनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळालं आहे. मशिदीचं अतिक्रमण असो अथवा सारसबाग परिसरामध्ये रमजानच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून मेधा कुलकर्णी यांनी आक्रमकपणे आवाज उठवल्याचं पाहिला मिळाल आहे.

Pune Junctiion Medha Kulkarni  .jpg
Kolhapur News: कोल्हापूरच्या हद्दवाढीवर बोलता बोलता शिवसेनेच्या आमदाराची गाडी थेट लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचली

अशातच आता मेधा कुलकर्णी यांनी पुणे(Pune) रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याची मागणी केली आहे. या पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावं अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.

पुणे स्टेशनचे नुतनीकरण करणं अत्यंत आवश्यक असून हे हे नूतनीकरण करत असताना पुण्याचा देदिप्यमान इतिहासाचं त्यातून दिसणे आवश्यक आहे. त्यामुळे या पुणे रेल्वे स्टेशनचे नुतनीकरण करताना पुण्याचा इतिहास त्यातून दिसेल याची काळजी घ्यावी. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील अशीच संकल्पना आहे असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

Pune Junctiion Medha Kulkarni  .jpg
Abu Azmi Controversy: अबू आझमीच्या तोंडून भाजपनेच उभा केला वाद; काँग्रेसच्या बड्या नेत्याने केला आरोप

कुलकर्णी म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे की देशातील रेल्वेस्थानकं आणि विमानतळं अशी असली पाहिजेत की जिथे त्या शहराच्या व आपल्या देशाच्या इतिहासाचं प्रतिबिंब दिसेल. हीच कल्पना आता पुण्यातही प्रत्यक्षात यायला हवी. पुणे रेल्वेस्थानकाचं नुतनीकरण करताना, स्थानक परिसरात पुण्याच्या समृद्ध इतिहासाचे दर्शन घडले पाहिजे. विशेषतः, पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, 'थोरले बाजीराव पेशवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या स्वराज्याचा भव्य विस्तार केला. त्यांनी हिंदवी स्वराज्याचा कटक ते अटक असा व्यापक फैलाव केला. शनिवारवाडा हे त्यांच्या पराक्रमाचे आणि स्वराज्याच्या वैभवाचे प्रतीक आहे. पुणे हे त्या काळात स्वराज्याचे प्रमुख केंद्र होते. त्यामुळे पुणे रेल्वेस्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं, ही आमची स्पष्ट आणि योग्य अशी मागणी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com