Medha Kulkarni News: एकाच पत्रकार परिषदेत भाजपच्या मेधा कुलकर्णी संतापल्या अन् रडल्याही; पेटलेल्या नामांतराच्या वादावर म्हणाल्या...

Pune Railway Station Rename Issue: भाजपच्या राज्यसभा खासदार आणि महिला नेत्या मेधा कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केली होती.या मागणीनंतर आरोप-प्रत्यारोपांनी पुण्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघाल्याचं दिसून येत आहे.
Shiv Sena (UBT) puts up banners against BJP’s Medha Kulkarni in Pune amid station renaming controversy.
Shiv Sena (UBT) puts up banners against BJP’s Medha Kulkarni in Pune amid station renaming controversy.sarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजपच्या राज्यसभा खासदार आणि महिला नेत्या मेधा कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केली होती.या मागणीनंतर आरोप-प्रत्यारोपांनी पुण्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघाल्याचं दिसून येत आहे.सोशल मीडिया, बॅनर यांसह विविध मार्गांनी विरोधकांकडून कुलकर्णी यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. यावरुन खासदार मेधा कुलकर्णीं (Medha Kulkarni) चांगल्याच भावूक झाल्याचं दिसून आलं.

भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी शुक्रवारी(ता.27)पत्रकार परिषदेत पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराच्या मागणीवरुन उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रोलर्संना सणसणीत चपराक लगावली. त्या म्हणाल्या,पुणे स्टेशनला सध्या नावच नाही. त्यामुळे,आता आपण सगळे नाव देऊ शकतो. बाजीराव पेशवे भूषणवाह नाव आहे, ते नाव द्यावे, असे मत मी मांडले. कोणीही आपलं मत मांडू शकतो, टीका होऊ शकते. पण,मस्तानीचं नाव बुधवार पेठेला द्या म्हणता?असे म्हणत मेधा कुलकर्णी संतापल्या. याचवेळी त्यांना रडू कोसळले.

मेधा कुलकर्णी यांच्या नामांतराच्या मागणीनंतर राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी पुणे शहरातील रेल्वे स्थानकासाठी विविध नावे सुचवली आहे. त्यामध्ये,महात्मा ज्योतिबा फुले आणि राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्याचीही मागणी करण्यात आली होती. कुलकर्णी यांच्या मागणीला विरोधही दर्शवत आंदोलनही करण्यात आले.

पुणे शहरात विविध ठिकाणी पुण्यातील बुधवार पेठेला मस्तानीचं नाव द्या,अशा आशयाचे बॅनर झळकले होते. याच बॅनरवरुन मेधा कुलकर्णी प्रचंड भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. टीका करताना अमर्याद भाषा वापरल्याचं सांगितलं. याचवेळी कुलकर्णी यांना रडू कोसळलं.

Shiv Sena (UBT) puts up banners against BJP’s Medha Kulkarni in Pune amid station renaming controversy.
BJP News: 'लाडकी बहीण'साठी निधीची पळवापळवी; आदिवासी विकासमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले,'विरोधकांचे आरोप खरे...'

खासदार मेधा कुलकर्णी यांच्या पुणे रेल्वे स्टेशनबाबतच्या मागणीला प्रत्युत्तर म्हणून शहरात ठिकठिकाणी'कोथरूडच्या बाई, नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव 'मस्तानी पेठ' करा!'या आशयाचं बॅनरबाजी करण्यात आली होती.विशेष म्हणजे हे बॅनर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Shivsena पक्षातर्फे झळकवण्यात आले होते.

याच बॅनरवरुन मेधा कुलकर्णी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, पुणे स्टेशनला आम्ही नाव द्या म्हटले पण निर्णय घेणारे वेगळे लोक आहेत. आम्ही अर्ज केला आहे, आमच्यावर टीका होऊ शकते, पण त्याला लेव्हल ठेवा, अशा शब्दांत खासदार कुलकर्णींनी विरोधकांना खडसावलं.

Shiv Sena (UBT) puts up banners against BJP’s Medha Kulkarni in Pune amid station renaming controversy.
Shaktipeeth Highway : फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टमुळे 'महाराष्ट्र' कर्जबाजारी होणार? तिजोरीची 'शक्ती' वाढवण्याचे आव्हान!

कुलकर्णी म्हणाल्या, नावाबाबतची प्रक्रिया होईल, मी जगभरात साडी नेसून गेले, माझे पोस्टर लावले मला खूप वाईट वाटले, अश्लील लावले. काळ सोकावू नये म्हणून तशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे. टीकेला मर्यादा तर ठेवा, महिला वर्ग म्हणून आपण बोलले पाहिजे, अशाही भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com