Prakash Shendge, Pankaja Munde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pankaja Munde News : भाजप ही वडिलांची प्रॉपर्टी हा पंकजाताईंचा गैरसमज आता दूर होईल !

Mangesh Mahale

Pandharpur : भाजपकडून ४० नेत्यांच्या स्टार प्रचारकांची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतून पंकजा मुंडे यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना भाजप डावलतंय, असे चित्र आहे. ओबीसी नेते प्रकश शेंडगे यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"भाजप म्हणजे माझ्या वडिलांची प्रॉपर्टी हा पंकजा मुंडे यांना झालेला गैरसमज आता तरी दूर होईल. त्यांच्याबाबत भाजपमध्ये जे घडते आहे, त्या मानसिकतेतून त्यांनी बाहेर पडणे गरजेचे आहे," असा सल्ला प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.

"भाजपमधून मुंडे कुटुंबीयांना काय मिळेल, अशी अपेक्षा न करता त्यांनी स्वतंत्रपणे आता स्वत:चा सवतासुभा निर्माण करण्याची वेळ झाली आहे. याला आणखी उशीर झाला, तर तो बहुजन समाजाच्या चळवळीसाठी मारक ठरेल," अशी भीती शेंडगे यांनी व्यक्त केली.

४० नेते आणि ४० ठिकाणी सभा

भाजपकडून ४० नेत्यांच्या स्टार प्रचारकांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुपूर्त करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे.

प्रचारादरम्यान भाजप एकाच दिवशी ४० नेत्यांच्या ४० ठिकाणी निवडणूक सभा घेणार आहेत. प्रचारासाठी देशभरातील कार्यकर्त्यांची निवड करून भाजप त्यांना प्रशिक्षण देणार आहे.

भाजपने देशभरातील ८ हजार भाजप कार्यकर्त्यांमधून ३ हजार जणांची निवड केली आहे. या कार्यकर्त्यांना भाजपतर्फे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर या कार्यकर्त्यांना मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम, तेलंगणा या राज्यांमध्ये निवडणुकीच्या कामासाठी पाठवले जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT