Rohidas Munde News : दिव्यात भाजपला धक्का; रोहिदास मुंडे ठाकरे गटात प्रवेश करणार

Maharashtra Politics : दिव्यात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
Rohidas Munde , Uddhav Thackeray
Rohidas Munde , Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Dombivali : शिंदे गटाचे प्रमुख विरोधक आणि माजी दिवा भाजप शहराध्यक्ष रोहिदास मुंडे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर मुंडे ते त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत.

दिवा विकासाच्या मुद्द्यावर कायम सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठविणारे भाजपचे माजी दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे हे दिव्याच्या प्रश्नावर कायमच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राहिले आहेत. भाजपचे दिवा मंडळ अध्यक्ष असताना त्यांनी दिव्यातील सत्ताधारी शिवसेना शिंदे गटातील पद्धधिकाऱ्यांना पाणी प्रश्न, अनधिकृत बांधकामे यावर चांगलेच अडचणीत आणण्याचे काम केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rohidas Munde , Uddhav Thackeray
Nana Patole News : फडणवीस मुख्यमंत्री असताना विदर्भाचे किती प्रश्न सुटले? पटोलेंनी विचारला जाब

मढवी यांच्यावर मुंडेंचा विशेष रोष

ठाणे महापालिकेत शिवसेना व भाजप युतीचे सरकार असले तरी दिव्याला विकासकामांच्या बाबतीत कायम दुजाभाव देण्यात आला आहे. माजी महापौरपददेखील दिव्याला मिळाले, पण विकास काही हवा तसा झाला नाही. शिवसेनेत ठाकरे शिंदे गट अशी फूट पडल्यानंतर मात्र भाजपने शिवसेनेतील सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यास सुरुवात केली. शिंदे यांचे समर्थक असलेले रमाकांत मढवी यांच्यावर मुंडे यांचा विशेष रोष असल्याचे दिसले आहे.

तेच काम ठाकरेंच्या शिवसेनेत करणार

आता मुंडे हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याने दिव्यात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. दिव्यातील विविध समस्यांवरही त्यांनी आवाज उठवला आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची सरकारमध्ये युती असली तरी मुंडेंनी शिंदेंच्या शिवसेनेला चांगलेच विविध प्रश्नांवर झोडपले होते. तेच काम ते आता ठाकरेंच्या शिवसेनेत येऊन करणार, असे रोहिदास मुंडे यांनी सांगितले.

Rohidas Munde , Uddhav Thackeray
Maratha Reservation : नेत्यांना जावं लागतंय मराठ्यांच्या रोषाला सामोरे; २४५ गावांमध्ये 'नो एन्ट्री'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com