पश्चिम महाराष्ट्र

Medha Kulkarni : आधी वादात झळकल्या? आता संसदेत कमाल! मेधा कुलकर्णींना यंदाचा संसद रत्न पुरस्कार

Medha Kulkarni Sansad Ratna Award : यंदाच्या वर्षी सुप्रिया सुळेंबरोबरच पुणे जिल्ह्यातील आणखी एका महिला खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. यामुळे पुण्याचा डंगा राजधानीक वाजला आहे.

Sudesh Mitkar

बातमीचा थोडक्यात सारांश :

  1. मेधा कुलकर्णी यांना संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले असून त्यांची संसदीय कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.

  2. त्यांनी सारसबाग रमजान गर्दी, वक्फ बोर्ड जमीन वाद आणि पुणे रेल्वे स्थानक नामांतराबाबत प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे.

  3. या भूमिकांमुळे त्या गेल्या काही दिवसांपासून सतत वादग्रस्त विधानांच्या केंद्रस्थानी आहेत.

Pune News : गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. त्यांच्यासोबतच पुणे जिल्ह्यातून मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांना या पुरस्काराने यापूर्वी देखील गौरवण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी सुप्रिया सुळेंबरोबरच पुणे जिल्ह्यातील आणखी एका महिला खासदाराचा यात समावेश झाला आहे. भाजपच्या नेत्या खासदार मेधा कुलकर्णी यांना संसद रत्न पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. (Rajya Sabha MP Medha Kulkarni awarded the Sansad Ratna Award 2025 amidst controversy over her Hindutva stance and demands to rename Pune Railway Station to Bajirao Peshwa)

भाजपकडून राज्यसभा खासदार पदी मेधा कुलकर्णी यांची वर्णी लागल्यानंतर त्या सातत्याने प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. रमजानच्या काळामध्ये सारसबाग येथे होणाऱ्या गर्दी बाबत त्यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यासोबतच वक्फ बोर्डाने हडपलेल्या जमिनी बाबत देखील त्यांनी आवाज उठवला होता. नुकताच त्यांनी पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वादही निर्माण झाल्याचं पाहायला मिळेल. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मेधा कुलकर्णी या वादाच्या केंद्रभागी असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच त्यांना संसद रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन येथे आयोजित सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण झाले. प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी लोकसभा आणि राज्यसभेतील उल्लेखनीय कार्याबद्दल खासदारांना 'संसदरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा 17 खासदारांना या पुरस्काराचा मान मिळाला. राज्यसभेची पहिलीच टर्म असलेल्या प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत सक्रिय सहभाग नोंदवल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

कुलकर्णी यांनी महिला आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय, वक्फ बोर्डाच्या संबंधित विषयांवर संसदेमध्ये सातत्याने मुद्देसूद भाष्य केले होते. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यांनी ग्रामीण भागातील महिलांमध्ये वाढत चाललेल्या कर्करोगाच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. तसेच नवीन शिक्षण धोरणासंबंधित काही सूचना केल्या होत्या.

याबाबत मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “हा सन्मान केवळ माझा नाही, तर जनतेच्या अपेक्षा संसदेत प्रभावीपणे मांडण्याच्या प्रयत्नांचा गौरव आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधीची खरी ओळख त्याच्या कृतिशीलतेत असते. पहिल्यांदाच खासदार झालेली असताना संसदरत्न पुरस्कार मिळणे ही जनतेच्या आशीर्वादाची पावती आहे. लोकहितासाठी यापुढे परखडपणे भूमिका मांडत राहील.”

पडणारे प्रश्न :

1. मेधा कुलकर्णी कोण आहेत?
– मेधा कुलकर्णी या राज्यसभा सदस्य असून भाजपच्या महिला नेत्या आहेत. त्यांना संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

2. त्यांनी कोणत्या वादग्रस्त मागण्या केल्या आहेत?
– पुणे रेल्वे स्थानकाला बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची, वक्फ जमिनीबाबत चौकशीची आणि रमजान गर्दीवर आक्षेप अशी मागणी त्यांनी केली आहे.

3. संसद रत्न पुरस्कार कशासाठी दिला जातो?
– खासदारांच्या संसदेतल्या कामगिरीवर आधारित हा पुरस्कार दिला जातो.

4. या वादांमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम झाला आहे का?
– उलट, त्यांचे विधान आणि ठाम हिंदुत्ववादी भूमिका यामुळे त्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून, त्यांचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT