Tanaji Sawant Big Statement On Guardian minister of Solapur :
Tanaji Sawant Big Statement On Guardian minister of Solapur : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News: भाजप - शिवसेनेत नव्या वादाची ठिणगी? सोलापूरच्या पालकमंत्रीपदासाठी सावंत आग्रही,म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

भारत नागणे-

पंढरपूर : सोलापूरच्या पालकमंत्रीपदावरुन भाजप आणि शिवसेनेचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सोलापूरचे पालकमंत्री मागत होतो, परंतू, मला धाराशिव आणि परभणीचे पालकमंत्री केले हे माझे दुर्देव असल्याची खंत व्यक्त करत अजूनही वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे पुन्हा मला सोलापूरचे पालकमंत्री पद देतील असा थेट दावा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केला आहे.

आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते रात्री पंढरपूर येथे वडार भवनाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना सावंत यांनी सोलापूरचे पालकमंत्री न मिळाल्याची खदखद देखील बोलून दाखवली.

सोलापूरचे पालकमंत्री म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते महसूमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी दिली आहे. त्यानंतर आता मूळचे सोलापूरचे असलेल्या सावंत यांनी अचनाक सोलापूरच्या पालकमंत्री पदावर दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सावंत नेमकं काय म्हणाले..?

मी सोलापूरचे पालकमंत्री पद मागत होतो. तरीही मला धाराशिव आणि परभणीचे पालकमंत्री केले. दुर्दैव आहे मी तीकडे गेलो. आज सोलापूरचा पाकमंत्री असतो तर डीपीडीसीमधून सावंत काय...काय देतात ते पाहायला मिळलं असतं. अजूनही वेळ गेलेली नाही बघू. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सोलापूरच्या पालकमंत्री पदासाठी माझा विचार करतील असेही मंत्री डॉ. तानाजी सावंत( Tanaji Sawant ) म्हणाले.

सावंत यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आपण बंड केले असा गौप्यस्फोट केल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच आता सोलापूरच्या पालकमंत्रीपदावरुन अजूनही वेळ गेलेली नाही बघू काय होत ते असं सूचक वक्तव्य सावंत यांनी केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते...

पंढरपूर येथील चंद्रभागा मैदानावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा झाल्या. त्यांच्या सभांना जितकी गर्दी जमली नाही,त्यापेक्षा अधिक गर्दी सावंत बंधूनी याच मैदानावर जमवून दाखवली असं मोठ वक्तव्य आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.

2018 मध्ये उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा पंढरपूर येथील चंद्रभागा मैदानावर झाली होत. या सभेचे नियोजन मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे होते. या सभेला सात लाख लोक आल्याचा नवा दावाही त्यांनी केला आहे. अलिकडेच मालेगाव येथील उध्दव ठाकरे यांच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. त्या सभेला उद्देशून बोलत असताना डाॅ.सावंत यांनी जे बाळासाहेबांना जमलं नाही ते सावंत बंधूनी पंढरपुरात करुन दाखवल्याचे सांगत उध्दव ठाकरे यांना‌ टोला‌ लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT