Nagpur Crime News: धक्कादायक! काँग्रेस आमदाराच्या नावानं मागितली तब्बल एक कोटीची लाच,काय आहे प्रकरण?

Anti Corruption Bureau Action: लाचलुचपतच्या कारवाईमुळे एकच खळबळ....
ACB Action
ACB Action Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर येथे काँग्रेस आमदाराच्या नावाने २५ लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधकच्या नागपूर विभागानं मोठी कारवाई केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नागपूरमध्ये काँग्रेस(Congress) आमदाराच्या नावाने लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी दुपारी दिलीप खोडे नावाच्या व्यक्तीला 25 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पक़डण्यात आलं आहे. आरोपी खोडे हा टेक्निशियन पदावर काम करत असल्याचं समोर आलं आहे.

ACB Action
Covid Infection to Shambhuraj Desai: भुजबळांनंतर मंत्री शंभूराज देसाई यांनाही कोरोनाची लागण

काय आहे प्रकरण ?

नागपुरात एका महिला अधिकाऱ्याने आपल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून विनयभंग करण्यात आल्याची तक्रार केली होती. या महिला अधिकाऱ्यानं विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार वजाहत मिर्झा( MLA Dr. Wajahat Mirza)यांच्याकडे देखील तक्रार केलेली होती. तसेच याप्रकरणी पीडित महिलेनं संबंधित आमदाराला विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करावे आणि कारवाई करण्याची मागणी करावी अशी विनंतीही केलेली होती. पण त्यानंतर हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

ACB Action
Rahul Gandhi Said Sorry : राहुल गांधी म्हणतात माफी मागत नाही; मग हे काय ? घ्या पुरावे !

काँग्रेस आमदाराचीही चौकशी होण्याची शक्यता..

पीडित महिला अधिकाऱ्याने ज्या अधिकाऱ्यावर आरोप केले होते. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यानं मोठे प्रयत्न केले. आता या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून स्पष्ट झालं आहे. काँग्रेस आमदार वजाहत मिर्झा यांच्या नावाने तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अखेर तडजोडी अंती हे 25 लाखांवर प्रकरण मिटवण्याचं ठरलं. त्यामुळे या प्रकरणी काँग्रेसच्या आमदाराच्या अडचणी वाढल्या असून त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com