MLC Shashikant Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास भाजपने आम्हाला सांगू नये… शशिकांत शिंदे

Shashikant Shinde : लवकरच जनता भाजपचा कडेलोट करेल, असा इशाराही आमदार शिंदे यांनी दिला.

Umesh Bambare-Patil

Ajit Pawar News : विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढून राजकारण करण्याची भाजपची रणनिती सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास बदलणाऱ्यांनी आम्हाला इतिहास सांगू नये. राज्यपालांसह भाजपच्या अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं, त्यावेळी ही मंडळी कुठं होती, असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सध्या राजकारण पेटलं आहे. भाजप-हिंदुत्ववादी संघटनांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप रस्त्यावर उतरली आहे. सातारा व कराडमध्ये भाजपने आंदोलन करुन श्री.पवार यांच्या प्रतिमेस जोडे मारले होते.

भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर जाऊन विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट केला. या प्रकारानंतर अजित पवार यांची बाजू आमदार शशिकांत शिंदे यांनी सावरताना भाजपवर हल्लाबोल केला आहे.

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढून राजकारण करण्याची भाजपची ही रणनिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ज्यावेळी महाराष्टाचे राज्यपालांसह भाजपच्या अनेक नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावेळी खासदार उदयनराजेंनीही त्यांचा विरोध केला होता. त्यावेळी भाजपची मंडळी कुठं होती. त्यांनी सोईचे राजकारण करायचे का.

भाजपकडून छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी बोलण्याचे राजकारण केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास बदलणाऱ्यांनी आम्हाला संभाजी महाराज यांचा इतिहास सांगू नये. लवकरच जनता भाजपचा कडेलोट करेल, असा इशाराही आमदार शिंदे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT