Satara, 10 April : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना झालेली अटक, तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. संपूर्ण राज्यासह विधीमंडळातही त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्या संपूर्ण घडामोडीमागे भाजप नेते होते, हे उघड सत्य आहे. मात्र, पालकमंत्री देसाई यांनी विधानसभेतही भाजपचे नाव घेतले नव्हते. पण आज प्रथमच शंभूराज देसाईंनी भाजपवर हल्ला चढवत भाजपने प्रशासनाचा वापर करून आमची सत्ता घेतली नाही तर हिसकावली’असा गंभीर आरोप केला.
सातारच्या शासकिय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आपली भूमिका मांडली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३६ सदस्यांचे बहुमत होते. असे असतानाही पोलिस आणि जिल्हा प्रशासनाचा वापर करून भाजपने साताऱ्यात सत्ता मिळवली नाही, तर आमच्याकडून हिसकावली.
दरम्यान, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत व्हीप मोडणाऱ्या शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. संबंधित याचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे, असेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले, ही केवळ राजकीय लढत नसून ‘दडपशाही’ आणि ‘प्रशासकीय हस्तक्षेप’ याचा परिणाम आहे. मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतल्याचे नमूद करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व घडामोडींची माहिती देण्यात आली होती.
व्हीप मोडणाऱ्या सदस्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून संबंधित याचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे. दोन सदस्यांना पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप करत मंत्री देसाई म्हणाले, भाजपने सत्ता मिळवली नाही, तर आमच्याकडून हिसकावली, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
दरम्यान, कोयना दौलत डोंगरी महोत्सवास सुमारे १२ हजार पर्यटकांनी बोटिंगचा आनंद घेतला. या महोत्सवातून सव्वा कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचा दावा त्यांनी केला. भविष्यात राज्यभर अशा महोत्सवांचे आयोजन करण्यासाठी पर्यटन विभागाकडून अडीचशे कोटी रुपयांची मागणी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.