Satara ZP : जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाई, मकरंदआबांना इशारा : भाजपचा प्लॅन A, B अन्‌ C एक्झिक्यूट झालाय; D अजून व्हायचाय...!

Jaykumar Gore Warning to Shambhuraj Desai- Makarand patil : जयकुमार गोरे यांनी सातारा झेडपी निवडणुकीत भाजपचे प्लॅन ए, बी, सी यशस्वी झाल्याचे सांगत वेळ आल्यास प्लॅन डीही राबवू, असा विरोधकांना इशारा दिला.
Jaykumar Gore-Makarand patil-Shambhuraj Desai
Jaykumar Gore-Makarand patil-Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Satara, 04 April : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्लॅन ए, बी आणि सी एक्झिक्यूट झाला आहे. प्लॅन डी एक्झिक्यूट झाला असता तर चित्र वेगळे दिसले असते. ती वेळ आणखी आलेली नाही. ते वेळ येईल तेव्हा प्लॅन डीसुद्धा एक्झिक्यूट करू, असा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला.

सातारा (Satara) जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदानंतर चारही विषय समित्यांच्या सभापतिपदी भाजपचे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयकुमार गोरे यांनी हे भाष्य केले आहे. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यानंतर सभापती निवडी झाल्या. पण, आणखी पाच वर्षे बाकी आहेत, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला होता, त्याला उत्तर देताना ‘आम्हीही बघायलाच बसलो आहे,’ असा प्रतिइशारा मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी दिला.

ते म्हणाले, आम्हाला कल्पना आहे की, पाच वर्षे कारभार करायचा आहे. सर्वांना सोबत घेऊन लोकाभिमुख काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. पण, सातत्याने धमकी त्यांनी द्यायची आणि ब्लेम आमच्यावर करायचा, असं सातत्याने होत आहे.

Jaykumar Gore-Makarand patil-Shambhuraj Desai
Anjangaon Statue Controversy : अंजनगावमधील पुतळा हलविण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय; माढा, मोहोळसह 50 गावांतील...

ज्यांना आपले सदस्य सांभाळता येत नाहीत. त्यांनी राजकारणावर फार चर्चा करू नये. ते सदस्य मनापासून भाजपसोबत आले आहेत. विराज शिंदे कोणाचे? कर्णेताई कोणाच्या? मागच्या आठवड्यात ते कोणाचे होते?, तशी परिस्थिती आली असती तर तुम्हाला कळलं असतं. आमचा प्लॅन डी एक्झिक्युट झाला नाही; म्हणून तुम्हाला समजलं नाही, असा सूचक भाष्यही गोरे यांनी केले

Jaykumar Gore-Makarand patil-Shambhuraj Desai
Satara ZP Update : सातारा ZP सभापती निवडणुकीवर बहिष्कार का? शंभूराज देसाई म्हणाले, ‘भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत...’

आम्ही भाजप म्हणून काम करतो : गोरे

भाजपत गट तट नाही, त्यामुळे सभापती ह्या गटाचा, अध्यक्ष, उपाध्यक्ष या गटाचा असं भाजपत काही नाही, आम्ही सर्वजण पक्ष म्हणून एकत्रित काम करत आहोत, असे गोरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com