BJP Solapur : आमदार सुभाष देशमुख यांना धक्का देत भाजपचे सोलापूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी सोलापूर पूर्वची जिल्हा कार्यकारिणी घोषित केली. या कार्यकारिणीवर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा वरचष्मा दिसून येत आहे. याशिवाय नुकतेच पक्षात पदार्पण केलेल्या माजी आमदार राजन पाटील यांच्या गटालाही संधी देण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन 2 आघाड्यांसह 3 सरचिटणीस, 9 उपाध्यक्ष, 8 चिटणीस, 1 कोषाध्यक्ष यांच्यासह 62 सदस्य अशा एकूण 84 जणांची कार्यकारिणी जाहीर केली. यात युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षपदी सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटातील दर्गनहळ्ळीचे (ता. दक्षिण सोलापूर) महेश बिराजदार यांची नियुक्ती झाली आहे. तर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्षपदी शहाजी पवार गटातील कारंब्याचे (उत्तर सोलापूर) विनायक सुतार यांना संधी दिली आहे.
भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे सुपुत्र मनीष देशमुख मागील कार्यकारिणीत सरचिटणीस होते. पण यंदा त्यांना वगळले आहे. मात्र, आमदार देशमुख यांच्या गटातील प्रभावती पाटील, राम जाधव यांना उपाध्यक्ष, यतीन शहा यांना चिटणीस, ज्येष्ठ नेते डॉ. चनगोंडा हविनाळे, भीमाशंकर नरसगोंडे, रमेश आसबे, अमोल कारंडे यांना सदस्यपदी संधी दिली आहे.
यापूर्वीचे जिल्हाध्यक्ष आमदार कल्याणशेट्टी यांच्या कार्यकारिणीत असलेल्या सरचिटणीस विकास वाघमारे आणि चिटणीस यतीन शहा यांना शशिकांत चव्हाण यांनी पुन्हा त्याचपदावर संधी दिली आहे. याशिवाय सरचिटणीसपदी अक्कलकोटमधून प्रदीप पाटील, मंगळवेढ्यातून संतोष मोगले यांना संधी दिली आहे. तसेच राजन पाटील समर्थक प्रकाश चवरे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
कार्यकारिणीत सर्वाधिक 22 जण आमदार कल्याणशेट्टी गटाचे आहेत. त्यामुळे कल्याणशेट्टी समर्थकांची संख्या अन्य तालुक्यांच्या तुलनेत जास्त आहेत. त्यांचा मतदारसंघ दोन तालुक्यात विभागल्याचाही तो परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
उपाध्यक्ष : मोतीराम राठोड, राम जाधव, रामचंद्र होनराव, प्रणव परिचारक, प्रकाश चवरे, सोनाली गवळी, प्रभावती पाटील, पिंटू राऊत, बापू गोडसे.
चिटणीस : यतीन शहा, गणेश भोसले, गणेश अधटराव, महेश सोहनी, सुनील डोंबे, सुनील थोरबोले, अमोल कारंडे.
कोषाध्यक्ष : विश्वास चव्हाण
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.