Solapur ZP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur ZP : झेडपी निवडणुकीची घोषणा होताच भाजप लागला कामाला; पालकमंत्री गोरेच प्रभारी?,पहिल्याच दिवशी उचलले ‘हे’ पाऊल...

BJP News : राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केली. सोलापूरमध्ये ६८ गट व १२५ गण असून भाजपने इच्छुकांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 13 January (अप्पासाहेब हत्ताळे) : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुकांची आज (ता. १३ जानेवारी) राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ गट, तर पंचायत समितीच्या १२५ गणांचा समावेश आहे. निवडणुकीची घोषणा होताच कायम इलेक्शन मोडवर असलेल्या भाजपने उद्यापासून (ता. १४ जानेवारी) इच्छुकांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे. तसे आवाहन जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी भाजपमधील इच्छुकांना केले आहे.

सोलापूर (Solapur) जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी, तर अकरा पंचायत समितीच्या १३६ गणांसाठी येत्या पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर सात फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर सोलापूरसह बारा जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाली आहे.

जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समितीसाठी येत्या शुक्रवारपासून (ता. १६ जानेवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे, त्यामुळे भाजपने बुधवारपासूनच (ता. १३ जानेवारी) इच्छुकांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे.

भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या कार्यकर्त्यांनी संबंधित तालुकाध्यक्षांकडे आपले उमेदवारी अर्ज भरून द्यायचे आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ जानेवारीपर्यंत असणार आहे. त्यामुळे अवघ्या आठ दिवसांचाच कालावधी शिल्लक राहिलेला आहे, त्यामुळे भाजपकडून इच्छुकांना उमेदवारी अर्ज पक्षाकडे देण्याचा कालावधी दोन ते तीन दिवस दिला जाण्याची शक्यता आहे.

इच्छुकांनी उमेदवारी मागणीचा अर्ज दिल्यानंतर त्यांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मात्र, त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. त्यानंतरच मुलाखतीची प्रक्रियाही पूर्ण केली जाणार आहे. त्याची तारीख अद्याप निश्‍चित केले नसल्याचे जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.

पालकमंत्री गोरेच प्रभारी?

प्रदेश भाजपने पाच नोव्हेंबर रोजी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभारी व निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली होती. सोलापूरचे प्रभारी म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर पूर्व निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार राम सातपुते तर सोलापूर पश्‍चिमसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी पालकमंत्री गोरे हेच प्रभारी राहणार असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT