

Solapur, 13 January : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा खाली बसण्याआधीच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यांतील 335 जिल्हा परिषद गट, तर पंचायत समितीच्या 670 गणांमध्ये प्रचाराचा धुरळा उडणार आहे. या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींसाठी 05 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 07 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषदा (Zilla Parishad) आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला सोमवारी मुदतवाढ दिली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकीची घोषणा केली आहे. उर्वरीत जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या जिल्हा परिषदांचा समावेश 05 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये असणार आहे. यात पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या 335 एवढ्या जागांसाठी, तर पंचायत समितीच्या 670 एवढ्या जागांसाठी मतदान होणार आहे.
सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेचे 68 गट असून पंचायत समितीचे 136 गण आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील 24 लाख 59 हजार 227 मतदार मतदान करणार आहेत. साताऱ्यात झेडपीचे 65 गट असून 130 गण आहेत. त्यासाठी 21 लाख 91हजार 302 मतदार मतदान करणार आहेत.
सांगली जिल्हा परिषदेत 61 गट असून पंचायत समितीचे 122 गण आहेत, या गण आणि गटात 16 जानेवारीपासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे. कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या 68 जागा असून पंचायत समितीच्या 136 जागांसाठी मतदान होणार आहे, तर पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 73 गटांत, तर पंचायत समितीच्या 146 गणांत निवडणुका होणार आहेत.
जिल्हानिहाय गट आणि गणांची संख्या पुढीलप्रमाणे
सोलापूर :
गट : 68 (मागील 62)
गण : 136
एकूण : 24 लाख 59 हजार 227
महिला : 13 लाख
...............
सातारा
गट : 65
गण : 130
एकूण मतदार : 21 लाख 91हजार 302
सांगली
गट : 61
गण : 122
...................................
कोल्हापूर
गट : 68
गण : 136
...................................
पुणे
गट : 73
गण : 146
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.